You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे: पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेनं जायचं नाहीये
सर्व काही उघडत आहोत याचा अर्थ कोरोना संपला असा होत नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधत आहेत.
'दिल्लीत तिसरी लाट आलीये. अहमदाबादमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना आणि सहव्याधी असलेल्यांना कोरोना धोका अधिक आहे. आताच्या लाटेत तरुणही संक्रमित होत आहेत. हे तरुण लक्षणांकडे दुर्लक्ष करून वापरले तर घरातील ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास होईल,' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
उद्धव यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-
- लस अजूनही हातात आलेली नाही. त्यामुळे मास्क घालणे, दोन हातांचं अंतर राखणं आणि हात धुणं हीच त्रिसूत्री आहे.
- विनामास्क घराबाहेर पडू नका. अनावश्यक असेल तर बाहेर पडू नका. घरीच राहा.
- आपल्या हालचालीवर थोडसं नियंत्रण आणावं लागणार आहे. आपण धोक्याच्या वळणावर आहोत म्हणून मी तुम्हाला सूचना देतोय.
- पोस्ट कोव्हिड परिस्थिती फार महत्त्वाची आहे. कोव्हिड झाल्यानंतरचे साइड इफेक्ट खूप आहेत. मेंदू, हृदय, फुफ्फुसं आणि इतर अवयवांवर याचा परिणाम होतोय.
- शाळा उघडू शकतो का नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे?
- मंदिरात गर्दी करू नका. शिर्डीच्या मंदिरात व्यवस्था कोलमडली अशी बातमी वाचली. का असं झालं? मी तपासणार आहे
- काही लोकांनी मला सुचवलं, की रात्रीची संचारबंदी लावा. प्रत्येक गोष्टीबाबत कायदे करण्याची गरज नाही. आपण फटाक्यांबाबत कायदा केला नाही. पण, आपण फटाके वाजवले नाहीत
- दिल्ली, अहमदाबाद मध्ये लाट प्रचंड प्रमाणात आली आहे
- 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' याचा हेतू लोकांपर्यंत पोहोचणं आहे. त्यासोबत महाराष्ट्राच्या आरोग्याचा नकाशा तयार करणं हाही त्यामागचा उद्देश होता. आता महाराष्ट्राचं आरोग्य कसं आहे हे आपल्याला कळलं आहे
- सहव्याधी असलेल्या नागरिकांची चौकशी करा. आरोग्य अधिकारऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)