कोरोना व्हायरस : दिवाळीची खरेदी करण्यासाठी गर्दी, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

राज्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन दिवाळीची खरेदी करताना गर्दी न करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.

पण, सध्या दिवाळीची खरेदी करण्यासाठी राज्यातल्या अनेक भागांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र येताना दिसून येत आहेत.

मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अमरावती अशा वेगवेगळ्या शहरांमधील बाजारपेठा दिवाळीनिमित्त गजबजलेल्या दिसून येत आहे.

ग्राहकांचाही त्यांना चांगला प्रतिसाद लाभल्याचं जमलेल्या गर्दीमुळे समोर येत आहे.

पण, यंदाची दिवाळी ही इतर वेळच्या दिवाळीपेक्षा वेगळी आहे, कारण यंदा कोरोनाचं संकट आपल्यासमोर आहे, म्हणून ही दिवाळी गर्दी न करता घरात राहून साजरी करावी, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं होतं.

रविवारी (8 नोव्हेंबर) जनतेला संबोधित करताना त्यांनी असं आवाहन केलं होतं. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवसापासूनच राज्यभरातल्या अनेक बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून आली.

राज्यात कुठे कुठे गर्दीची दृश्यं समोर आली, तेच आपण फोटोंच्या माध्यमातून पाहणार आहोत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)