महाराष्ट्रात सिनेमा हॉल, नाट्यगृहं, मल्टीप्लेक्स सुरू होणार

मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्य सरकारने सिनेमा हॉल, नाट्यगृहं तसंच मल्टीप्लेक्स सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

कंटेनमेंट झोन वगळून, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या जलतरणपटूंसाठी जलतरण तलाव 5 नोव्हेंबर पासून खुले होतील. जलतरण तलावाच्या वापराकरता क्रीडा आणि युवक कल्याण खात्याने जारी केलेले एसओपी लागू होतील.

कंटेनमेंट झोन वगळून, योग केंद्र 5 नोव्हेंबरपासून खुले होतील. सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेले एसओपी लागू असतील.

बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश, शूटिंग रेज या इन्डोअर खेळांच्या केंद्रांना फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन प्रक्रिया अमलात आणून 5 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास अनुमती असेल.

कंटेनमेंट झोन वगळून, सिनेमाघरं, थिएटर, मल्टीप्लेक्स, नाटयगृहांना 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्यास 5 नोव्हेंबरपासून परवानगी असेल.

सिनेमाघरं, थिएटर, मल्टीप्लेक्स, नाट्यगृहात खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नाही. सांस्कृतिक खात्याने तसंच स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या एसओपी लागू असतील. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या एसओपीचं पालन करणं अनिवार्य असेल.

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी पत्रकाद्वारे ही घोषणा केली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)