'अलाउद्दिनचा दिवा' घासून राक्षस आल्याचं भासवून डॉक्टरची फसवणूक

दिवा

फोटो स्रोत, UTTAR PRADESH POLICE

आर्थिक भरभराट आणि आरोग्यलाभ होण्यासाठी अलाउद्दिनचा दिवा विकत देण्याच्या आमिषाने एका डॉक्टरला 30 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरात ही घटना घडली.

आरोपींनी संबंधित व्यक्तीला हा दिवा विकण्यासाठी अरेबियन नाईट्समधील एका कथेचा आधार घेतला. हा अलाउद्दिनचा दिवा असल्याचं भासवत त्यांनी दिव्यातून जीनसुद्धा बाहेर आल्याचं भासवलं.

या दिव्याच्या मोबदल्यात आरोपीने दीड कोटी रुपयांची मागणी केली होती. पण अखेर 30 लाख रुपयांत हा सौदा झाला.

या प्रकरणातील तिसरी आरोपी एक महिला असून ती सध्या फरार असल्याचं सांगण्यात येत आहे.

याप्रकरणी एका डॉक्टरने मेरठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दाखल तक्रारीबाबत NDTVने बातमी दिली आहे. त्यानुसार, डॉक्टर एका महिलेवर उपचार करत होता. दरम्यान महिलेने आपल्या कथित दोन मुलांबाबत डॉक्टरला सांगितलं.

त्या तिघांनीही आपल्याला एका बाबाविषयी माहिती असल्याचं डॉक्टरला सांगितलं. सदर बाबा चमत्कारी असून त्याच्याबद्दल डॉक्टरच्या मनात खूप काही बिंबवण्यात आलं. डॉक्टरने त्या बाबाला भेटावं, असं ते वारंवार सांगू लागले. त्यानंतर डॉक्टरने संबंधित बाबाची भेट घेतली.

नंतर त्याने आपल्याला अलाउद्दिनचे दर्शनही घडवले.

अलाउद्दिनचा दिवा खरा असल्याचं भासवण्यासाठी जीन बाहेर आल्याचं भासवण्यात आलं होतं.

पण आरोपींपैकीच एकजण त्यावेळी तसा पोशाख करून उभा होता, ही गोष्ट आपल्याला नंतर कळाल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

अखेरीस, आरोपींनी डॉक्टरला दिवा विकत घेण्यास सांगितलं. हा दिवा घरात असलेल तर आर्थिक स्थिती, आरोग्य आणि भविष्य उत्तम राहील, असा दावा त्यांनी केला. त्यासाठी दीड कोटी रुपयांची मागणी केली. पण 30 लाख रुपये या किंमतीवर सौदा पक्का करण्यात आला.

सदर आरोपींनी अशा प्रकारे आणखी काही लोकांची फसवणूक केली का, याचा तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून तिसरी आरोपी महिलेचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती मेरठ पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस अधिकारी अमित राय यांनी दिली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )