You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
VI : व्होडाफोन-आयडियाच्या एकत्रित ब्रँडची घोषणा
टेलिकॉम क्षेत्रातील व्होडाफोन आणि आयडिया एकत्रितपणे नव्या ब्रँडची घोषणा केली आहे. VI ज्याचा उच्चार वुई असा असल्याचं सांगत आता या कंपन्यांनी 'वुई' या नव्या ब्रँडची घोषणा केली आहे.
व्होडाफोन मधसा 'व्ही' आणि आयडियामधला 'आय' ही अक्षरं एकत्र करून या बँडचं नाव ठेवण्यात आलं आहे.
व्होडाफोन-आयडिया एकत्र आल्यानंतरही दोन्ही ब्रँड स्वतंत्रपणे काम करत होते. मात्र आता संयुक्तपणे नवा ब्रँड जाहीर करण्यात आला आहे.
या नव्या बँडची https://www.myvi.in/ ही बेवसाईटसुद्धा लॉन्च करण्यात आली आहे.
दरम्यान ज्यांच्याकडे व्होडाफोन किंवा आयडियाचे सीम आहेत, त्यांना काहीच बदल करावा लागणार नसल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच लोकांचे नंबर आणि प्लॅन आधी प्रमाणेच काम करणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
ऑगस्ट 2018 मध्ये या दोन्ही कंपन्यांचं एकत्रीकरण झालं. व्होडाफोनचे बहुतांश ग्राहक शहरी भागात आहेत तर आयडियाचा संचार प्रामुख्याने ग्रामीण भागात आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
ग्राहकांना कॉल केल्यानंतर अखंडित बोलता यावं, कॉल ड्रॉपसारख्या समस्या उद्भवू नयेत तसंच ग्राहकांसाठी नव्या योजना जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात व्होडाफोनच्या नेटवर्कसंदर्भात ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
जिओ आणि एअरटेल या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी व्होडाफोन-आयडियाला नव्या रुपात, नव्या ढंगात सादर व्हावं लागणार आहे.
व्होडाफोन ही ब्रिटिश कंपनी आहे तर आयडिया ही आदित्य बिर्लांची कंपनी आहे.
अॅमेझॉन आणि व्हेरीझॉन या कंपन्यांकडून झालेल्या गुंतवणुकीसंदर्भात माहिती देण्यात येईल. शेअर्सची विक्री आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून 25000 कोटी रुपयांपर्यंत रक्कम उभी करणार असल्याचं व्होडाफोन-आयडियाने स्टॉक एक्सचेंजला कळवलं आहे.
गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने कंपनीला दणका बसला होता. 58,254 कोटी रुपये जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. ही रक्कम जमा करण्यासाठी न्यायालयाने कंपनीला दहा वर्षांचा कालावधी दिला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)