कोरोना महाराष्ट्र : जिल्हाबंदी उठली, आता रेल्वे प्रवासाची मुभा, उद्यापासून बुकिंग सुरू

महाराष्ट्रात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी यापुढे ई-पास बंधनकारक नसेल, अशी माहिती महाराष्ट्र सरकारनं दिलीय. राज्य सरकारनं लॉकडाऊन शिथीलकरणाच्या पुढच्या टप्प्यासाठी नवे नियम घोषित केले.

आता राज्यात रेल्वे प्रवासाला देखील मुभा देण्यात आली आहे. मध्य रेल्वेने एका पत्रक प्रसिद्ध करून त्याची माहिती दिली आहे. त्यानुसार 2 सप्टेंबरपासून लोकांना राज्यांतर्गत रेल्वे प्रवासासाठी बुकींग करता येणार आहे. त्यामुळे आता लोकांना राज्यांतर्गत रेल्वेनं प्रवास करता येणार आहे.

भारतीय रेल्वेवर सध्या 200 स्पेशल गाड्या धावत आहेत. या गाड्यांचं बुकिंग आता राज्यातल्या अंतर्गत प्रवासासाठी करता येणार आहे.

मध्य रेल्वेच्या या गाड्यांचं करता येणार बुकिंग

सीएसटी ते वाराणसी

लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते वाराणसी

लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते गोरखपूर

लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते दरभंगा

लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते पाटणा

सीएसटी ते लखनऊ

लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते पाटलीपुत्र

सीएसटी ते भुवनेश्वर

सीएसटी ते बेंगलुरू

सीएसटी ते हैदराबाद

सीएसटी ते हावडा

सीएसटी ते गदक

लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते तिरूवअनंतपुरम्

सर्वांत महत्त्वाचे नियम-

  • सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या जागी तसेच प्रवास करताना मास्क वापरणे बंधनकारक
  • सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे, दुकानांमध्ये एकाचवेळेस 5 लोकांना परवानगी
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर नियमांनुसार कारवाई
  • सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखू यांचे सेवन करण्यास बंदी

कार्यक्रमांचे आयोजन आणि ऑफिस संदर्भातील नियम-

  • सार्वजनिक कार्यक्रमात 50 हून अधिक लोकांना परवानगी नाही.
  • 30 सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद राहणार.
  • खासगी कार्यालयांत तीस टक्के उपस्थितीसह काम करता येईल.
  • सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, एन्टरटेन्मेंट पार्क बंद राहणार.
  • खासगी बस वाहतुकीला परवानगी देण्यात आलीय.
  • मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनावरील बंदी कायम. लग्नासंबंधी कार्यक्रमांना 50 तर अंत्यसंस्कारांसाठी 20 व्यक्तींनाच परवानगी.

विशेष सूचना-

याबरोबरच सरकारने जाहीर केलेल्या परिपत्रकात काही सूचनाही देण्यात आल्या आहेत.

  • शक्य तितक्या प्रमाणात वर्क फ्रॉम होमच्या पर्यायाचा वापर करावा असे सूचवण्यात आले आहे. सर्व सार्वजनिक स्थळांवर थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायजर्स आणि हँडवॉश उपलब्ध करुन देण्याबद्दलही उल्लेख यात केला आहे.
  • सर्व कामाच्या ठिकाणी आणि लोक एकत्र येतात अशा जागा सतत सॅनिटाइज करणं आवश्यक आहे अशी सूचना या परिपत्रकात दिली आहे.

महाराष्ट्रात काय सुरू ?

  • हॉटेल्स आणि लॉजला 100% क्षमतेने काम करता येणार
  • आंतरजिल्हा वाहतुकीला पासची गरज नाही
  • सरकारी कार्यालयात A आणि B श्रेणीतील 100 टक्के कर्मचार्यांची उपस्थिती
  • खासगी कार्यालयांत तीस टक्के उपस्थितीसह काम करता येईल.
  • खासगी बस वाहतूकीला परवानगी
  • खुल्यावर व्यायाम करता येईल.

महाराष्ट्रात काय बंद?

  • रेस्टॉरंट, जिम, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, एण्टरटेन्मेंट पार्क बंद राहणार
  • ३० सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद राहणार
  • मेट्रो बंदच राहणार

वाहतुकीसाठी नियम-

  • सर्व प्रकारच्या वाहतुकीमध्ये मास्क आवश्यक
  • टॅक्सीमध्ये (गरज असेल तरच) 1+3 लोकांना परवानगी
  • रिक्षामध्ये (गरज असेल तरच) 1+2 लोकांना परवानगी
  • चारचाकी (गरज असेल तरच) 1+3 लोकांना परवानगी
  • दुचाकी 1+1 लोकांना परवानगी (हेल्मेट, मास्क आवश्यक)

वृद्ध आणि लहान मुलांसाठी सूचना-

65 वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांनी, कोमॉर्बिडीटी असणाऱ्या लोकांनी, गर्भवतींनी, 10 पेक्षा कमी वय असलेल्या मुलांनी घरातच राहावे. आरोग्याचे कारण, अत्यावश्यक काम याशिवाय त्यांनी बाहेर पडू नये अशी सूचना या परिपत्रकात केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)