कोरोना व्हायरस : नवनीत राणा म्हणाल्या- “तुमच्या प्रार्थनांमुळे मी मरतामरता वाचले"

खासदार नवनीत रवी राणा यांनां श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तात्काळ मुंबई नेण्याचा निर्णय घेण्यात आला आला. त्यांना लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आयसीयूमधून बाहेर आल्यावर राणा यांनी व्हीडिओच्या माध्यमातून आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली. "तुमच्या प्रार्थनांमुळे मी मरतामरता वाचले" असं त्यांनी या व्हीडिओमधून सांगितलं आहे.

6 ऑगस्ट 2020 रोजी नवनीत राणा यांना कोरोना झाल्याचा अहवाल समोर आला होता. त्यावेळी नवनीत राणा यांनी सोशल मीडियावरून यासंदर्भात माहिती दिली होती.

"माझी मुलगी आणि मुलगा कोरोनाग्रस्त झाले. शिवाय, कुटुंबीयांतील इतर सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली. आई म्हणून मुलांची काळजी घेणं माझं आद्यकर्तव्य होतं. मुलांची आणि कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेता घेता मलाही कोरोनाची लागण झाली," अशी माहिती नवनीत राणा यांनी दिली होती.

आपले आशीर्वाद आणि सदिच्छा यांच्या बळावर आम्ही कोरोनावर मात करू, अशी आशाही त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)