You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एलॉन मस्क यांची कंपनी डुकराच्या डोक्यात चिप बसवून कोणता प्रयोग करतीये?
उद्योगपती एलॉन मस्क यांनी मेंदूत इलेक्ट्रॉनिक चिप बसवलेल्या डुकराची ओळख जगाला करून दिली. गेरट्र्यूड नावाच्या डुकराच्या मेंदूत नाण्याच्या आकाराची चिप बसवण्यात आली आहे.
मेंदूसारखं काम करणारा मशीन इंटरफेस मस्क यांना तयार करायचा आहे.
तुमच्या मेंदूत छोट्या वायरींचं फिटबिट बसवता येण्यासारखं आहे, असं मस्क यांनी सांगितलं. मस्क यांची न्यूरालिंक कंपनी यंदा या उपकरणाची मानवी चाचणी सुरू करणार आहे.
मेंदूसंदर्भात विकार असलेल्या लोकांना या इंटरफेसद्वारे आपल्या मनाच्या साह्याने संगणक किंवा फोन हाताळता येऊ शकेल.
डिमेन्शिया, पार्किन्सन तसंच मणक्यांच्या आजार असलेल्या लोकांना त्यातून बरं होण्यासाठी ही चिप उपयुक्त ठरू शकते, असं मस्क यांना वाटतं.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
गेरट्र्यूड हे तीन डुकरांपैकी एक आहे जे शुक्रवारी (28 ऑगस्ट) मस्क यांनी दिलेल्या वेबकास्ट डेमोचा भाग होतं. या डुकरिणीने वातावरणाला सरावण्यासाठी थोडा वेळ घेतला. डुकरिणीने वाळलेला पेंढा खाल्ला तेव्हा इलेक्ट्रॉनिक आलेखावर हालचाल जाणवली. डुकरिणीने बाकी कशाला फारसा प्रतिसाद दिला नाही.
डुकरिणीच्या मेंदूत बसवण्यात आलेल्या चिपमध्ये प्रोसेसर आहे. तो वायरलेस सिग्नल प्रक्षेपित करतो. डुक्कर अन्नाच्या शोधात असताना तिच्या मेंदूत जी क्रिया होते ते आलेखावर दिसतं.
न्यूरालिंकचं मूळ उपकरण वर्षभरापूर्वी जगासमोर मांडण्यात आलं. तेच उपकरण सुलभ करून लहान बनवण्यात आलं आहे.
मेंदूमध्ये असलेल्या कवटीत ही चिप व्यवस्थित बसते. केसांच्या आत दडलेली असू शकते, तुम्हाला त्याचं अस्तित्व जाणवणारही नाही.
न्यूरालिंकची स्थापना 2017 मध्ये करण्यात आली. कंपनीतर्फे शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली. गेल्या महिन्यापर्यंत मस्क ट्वीटरवर शास्त्रज्ञांच्या शोधात होते.
3000 इलेक्ट्रॉड एकमेकांशी जटिल आणि अतिसूक्ष्म अशा वायरांनी जोडलं तर जसं दिसेल तसं हे उपकरण आहे. मानवी केसांपेक्षाही लहान अशी ही रचना आहे. ही चिप मेंदूच्या हालचाली टिपू शकतं.
हे उपकरण विकसित करण्यातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे मानवी मेंदूची गुंतागुंतीची रचना असं पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील कोर्डिंग लॅबचे प्रमुख अरी बेंजामिन यांनी सांगितलं.
रेकॉर्डिंग उपलब्ध झालं की, न्यूरालिंक त्या माहितीचं विश्लेषण करेल. आपला मेंदू नेमकं कसं काम करतो याची उकल करण्यासाठी हे रेकॉर्डिंग उपयोगी पडेल. मेंदू सूचना कशा पाठवतो, उद्दिष्टं आणि हालचाल कशी निश्चित होते हे समजून घेण्याचा प्रयत्न असेल.
मस्क यांच्या स्पेसएक्स आणि टेस्ला या कंपन्यांनी अंतराळ विज्ञान आणि इलेक्ट्रिक कार या दोन योजनांसह अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
धाडसी योजना जाहीर करण्याचा मस्क यांचा इतिहास आहे. मात्र योजनांचे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा बराच काळ लागत असल्याचंही स्पष्ट झालं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)