You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
NEET, JEE परीक्षा काय आहेत? या परीक्षा पास केल्यावर कुठे प्रवेश मिळतो?
कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या वर्षी अनेक समस्या निर्माण होताना दिसत आहेत. शैक्षणिक क्षेत्राला तर कोव्हिडचा खूप मोठा फटका बसला आहे.
मार्च महिन्यात कोरोनाची साथ भारतात पसरण्यास सुरुवात झाली होती. लॉकडाऊन केल्यानंतर शालेय तसंच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे अंतिम वर्ष वगळता सगळ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या.
उन्हाळी सु्ट्ट्यांचा काळ पूर्णपणे लॉकडाऊनमध्येच निघून गेला. आता शाळा कधी सुरू होणार त्याचे वेध सर्वांना लागले आहेत.
अशाच प्रकारे सर्वांचं लक्ष लागून असलेल्या परीक्षा म्हणजे JEE आणि NEET.
JEE आणि NEET ची परीक्षा वेळापत्रकानुसारच होईल, असं राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) मंगळवारी (25 ऑगस्ट) स्पष्ट केलं.
JEE आणि NEET परीक्षा साधारणपणे मे-जून महिन्यात होत असतात. यंदाच्या वर्षीची नीट परीक्षा 3 मे रोजी होणार होती. पण कोरोनामुळे याचं वेळापत्रक लांबलं.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - कोरोना लॉकडाऊन : महाराष्ट्रात जुलै महिन्यात काय अनलॉक होणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
लॉकडाऊनमध्ये हळुहळू शिथिलता दिली जात असताना NTA ने NEET आणि JEE परीक्षेची नवी तारीख जाहीर केली यानुसार NEET परीक्षा 12 सप्टेंबर आणि JEE ची परीक्षा 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान होईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.
JEE आणि NEET परीक्षा काय आहेत?
JEE म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. JEE-Mains आणि JEE-Advanced अशी दोन टप्प्यांत होणारी ही परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटीमध्ये प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाते. त्याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NITs), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIITs), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थांमध्येही या परीक्षेच्या आधारे प्रवेश दिला जातो.
तर NEET म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट ही वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक प्रवेश परीक्षा आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी या केंद्रीय संस्थेमार्फत या परीक्षा घेतल्या जातात. यंदा साधारण सोळा लाख विद्यार्थ्यांनी NEET साठी अर्ज केले असून, JEE-mains परीक्षेसाठी नऊ ते दहा लाख विद्यार्थांनी नाव नोंदवलं आहे. एप्रिल-मे महिन्यांत या परीक्षा होणार होत्या. पण कोरोना विषाणूच्या साथीमुळे दोनदा परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या.
NEET परीक्षा इंग्रजी, हिंदी किंवा मराठी भाषेत देता येऊ शकते. पात्र विद्यार्थी देशात कोणत्याही सरकारी किंवा संस्थांतर्गत कोट्यासाठी पात्र असतात. यात माध्यमांची दखल घेतली जात नाही.
योग्यता आणि शैक्षणिक पात्रता
12 वी शास्त्र विषयात शिकलेले विद्यार्थी NEET परीक्षा देऊ शकतात. त्यांनी आपल्या अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय घेतलेले असणं यासाठी महत्त्वाचं आहे. शिवाय 12 वीतील गुणांच्या टक्केवारीचाही विचार प्रवेशासाठी केला जातो.
NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवाराचं वय 17 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत विद्यार्थी नीट परीक्षेमार्फत महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)