You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्रीशैल्यम् आग: जलविद्युत प्रकल्पाला लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू
तेलंगणातील श्रीशैलम येथील जलविद्युत प्रकल्पात लागलेल्या आगीतून कर्मचाऱ्यांना वाचवण्यात एनडीआरआफला अपयश आले. त्यात 9 जणांचा मृत्यू झाला.
काल रात्री ही आग लागली होती. त्यानंतर आतमध्ये असलेले कर्मचारी केंद्रातच अडकून पडले. त्यांच्या सुटकेसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे पथक घटनास्थळी पोहचले होते आणि ते बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.
तेलंगणा व आंध्र प्रदेशच्या सीमा भागात असलेल्या श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पातील पॉवर हाऊसमध्ये गुरूवारी मध्यरात्री अचानक आग लागली. यावेळी तिथे 19 कर्मचारी होते. मात्र, 9 कर्मचारी आगीमुळे अडकून पडले.
एनडीआरएफने बचाव मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, शुक्रवारी दुपारी आधी सहा तर थोड्या वेळानं आणखी तीन जणांचे मृतदेह जवानांना मिळाले. 9 जणांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला.
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)