गणेशोत्सव : कोकणात जायला मध्य रेल्वे सोडणार 162 विशेष गाड्या

फोटो स्रोत, ANI
गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या सोडणार असल्याचं जाहीर केलंय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस इथून सुटणाऱ्या या गाड्या सावंतवाडी रोड, कुडाळ, रत्नागिरीपर्यंत धावतील.
कोकणात जायला मध्य रेल्वे एकूण 162 विशेष गाड्या सोडणार आहे.
या गाड्या संपूर्णपणे आरक्षित असतील. म्हणजेच आयत्यावेळी या गाडीचं तिकीट मिळू शकणार नाही.
13 स्लीपर क्लास, 6 सेकंड क्लास, AC - 2 टिअरचा एक डबा आणि AC - 3 टिअरचे चार डबे असं प्रत्येक ट्रेनचं स्वरूप असेल.
15 ऑगस्टपासून रेल्वेच्या आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाईटवर या ट्रेन्ससाठीचं आरक्षण खुलं होईल.
या रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवासाचे सर्व नियम पाळावे लागणार असल्याचं मध्य रेल्वेने स्पष्ट केलंय.
मध्य रेल्वेच्या वेबसाईटवर इथे या गाड्यांचं वेळापत्रक पाहता येईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








