You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमित शाहांची तब्येत बिघडली, पुन्हा एम्समध्ये दाखल
अमित शाह यांना शनिवारी (12 सप्टेंबर) रात्री 11 वाजता एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. श्वास घेण्यात त्रास होत आल्यामुळे अमित शहा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
अमित शाह यांना 18 ऑगस्टला दिल्लीमधल्या 'एम्स' हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. अमित शाह यांनी स्वतः ट्वीट करून याबद्दलची माहिती दिली होती.
"कोरोनाची सुरुवातीची लक्षणं दिसल्यानंतर मी कोरोना चाचणी केली. माझ्या चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती स्थिर आहे परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या माणसांनी कोरोना चाचणी करून घ्यावी अशी आहे", असं अमित शाह यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये अमित शाह यांच्यावर उपचार सुरू होते.
भाजप नेत्यांना कोरोना संसर्ग
गृहमंत्री अमित शहा यांच्याप्रमाणे भाजपच्या विविध राज्यातील नेत्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा आणि त्यांची कन्या यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. येडियुरप्पा यांना ट्वीट करून कोरोना झाल्याची माहिती दिली होती. प्रकृती ठीक आहे मात्र खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल झालो असल्याचं येडियुरप्पा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. येडियुरप्पा 78 वर्षांचे आहेत.
काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही कोरोना झाला होता.
तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनाही कोरोनाची लक्षणं जाणवू लागली. मात्र त्यांना गंभीर त्रास नसल्याने पुरोहित यांना घरीच विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला.
उत्तर प्रदेश भाजपचे प्रमुख स्वतंत्रता सिंग यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. रविवारचा दिवस भाजपसाठी ब्लॅक संडे ठरला.
उत्तर प्रदेश मंत्रीमंडळातील कॅबिनेट मंत्री महेंद्र सिंह यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. याव्यतिरिक्त योगी यांच्या मंत्रिमंडळातील चेतन चौहान, राजेंद्र प्रताप सिंह, धरम सिंह सैनी यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता.
आग्र्याचे भाजप आमदार योगेंद्र उपाध्याय यांना कोरोना झाल्याचं रविवारी स्पष्ट झालं. योगेंद्र उपाध्याय यांची पत्नी, दोन मुलं, आणि सुनेलाही कोरोनाची बाधा झाली आहे.
उत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री कमल राणी वरुण यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना संसर्गामुळे 18 जुलैला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)