कोरोनाः उत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री कमलराणी वरुण यांचं कोरोनामुळे निधन

फोटो स्रोत, twitter.com/kamalranivarun
उत्तर प्रदेशाच्या कॅबिनेट मंत्री कमलराणी वरुण यांचं कोरोनाची लागण झाल्यानं निधन झालं आहे.
18 जुलै रोजी कमलराणी वरुण यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर लखनऊस्थित SGPGI मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आज (2 ऑगस्ट) पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कमलराणी वरुण यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केलं. शिवाय, योगी आदित्यनाथ आज अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, तो दौरा रद्द करण्यात आला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कमल राणी वरुण या उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री होत्या. 2017 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्या कानपूरमधील घाटमपूर मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या.

फोटो स्रोत, Twitter/@kamalranivarun
घाटमपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी होणाऱ्या भाजपच्या त्या पहिल्याच नेत्या होत्या. गेल्याच वर्षी कमल राणी वरुण यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली होती.
कमलराणी यांनी संसदेत घाटमपूर लोकसभा मतदारसंघाचं दोनवेळा प्रतिनिधित्व केलं आहे. 1996 साली त्या पहिल्यांदा खासदार झाल्या. त्यानंतर 1998 सालच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी घाटमपूरमधून विजय मिळवला होता.
केंद्र सरकारच्या कामगार कल्याण समिती आणि उद्योग समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 1997 साली महिलांच्या सशक्तीकरणासाठी स्थापन झालेल्या समितीच्याही त्या सदस्या होत्या.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








