कोरोना व्हायरस: मुंबई महापालिकेची 9 रुग्णालयं 'नॉन-कोव्हिड' घोषित #5मोठ्याबातम्या

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

मुंबई महापालिकेची 9 रुग्णालयं 'नॉन-कोव्हिड' घोषित, इतर आजारांवर उपचार होणार #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1) मुंबई महापालिकेची 9 रुग्णालयं 'नॉन-कोव्हिड' घोषित

भारतातील कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मुंबई शहराला बऱ्याच दिवसांनी सकारात्मक बातमी ऐकायला मिळाली. मुंबईतील रुग्णवाढीचा दर कमी झाल्यानं आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या इतर साथीच्या आदारांवर उपचार व्हावेत म्हणून मुंबई महापालिकेनं 9 रुग्णालयं 'नॉन-कोव्हिड' करण्याचा निर्णय घेतलाय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

मुंबईत पावसाळ्यात विविध साथीच्या आजारांचं प्रमाण वाढतं. सध्या कोरोनामुळे बहुतांश रुग्णालयं कोव्हिडसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता होती. हीच शक्यता लक्षात घेऊन महापालिकेनं मुंबईकरांसाठी दिलासादायक पाऊल उचललंय.

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढीस लागल्यानंतर मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांपैकी 16 रुग्णालये कोव्हिड रुग्णालयं म्हणून घोषित केली होती. त्यातलीच 9 रुग्णालयं पुन्हा नॉन-कोव्हिड करण्यात आलेत.

2. मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. टंडन हे 85 वर्षांचे होते. जून महिन्यापासून त्यांची प्रकृती खालवली होती.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्क केला आहे. आपण एक कुशल प्रशासक गमावला आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

कोरोना
लाईन

3) कोरोना: 'लशीची मानवी चाचणी सुरू, प्रभाव कळायला तीन महिने लागतील'

कोरोनावरील भारतानं तयार केलेल्या लशीची मानवी चाचणी सुरू करण्यात आली असून, ही लस किती प्रभावी आहे हे कळण्यास तीन महिने जातील, अशी माहिती दिल्लीतील AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली. एनडीटीव्हीनं ही बातमी प्रसिद्ध केलीय.

या लशीच्या मानवी चाचणीचे तीन टप्प्यात निरीक्षण केले जाणार आहे. पहिली चाचणी काल (21 जुलै) पासून सुरू झालीय.

डॉ. रणदीप गुलेरिया

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, डॉ. रणदीप गुलेरिया

भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं 11 लाखांचा टप्पा पार केला आहे.

दुसरीकडे, ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना लस सुरक्षित असल्याचं आणि शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्तीला कोरोनाविरोधात लढायला सज्ज करत असल्याचं स्पष्ट होतं आहे.

4) ग्रामपंचायत प्रशासक निवडीला अण्णा हजारेंचा विरोध, आंदोलनाचा इशारा

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या निर्णयाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विरोध केला आहे. टाइम्स नाऊ मराठीनं ही बातमी दिलीय.

अण्णा हजारे

फोटो स्रोत, GANESH BHAPKAR

पालकमंत्र्यांच्या सल्ल्यानं ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमला जाणार असल्याचं ग्रामविकास मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलंय. पालकमंत्री त्याच्याच पक्षाच्या लोकांना प्राधान्य देईल, असा आरोप करत अण्णा हजारे प्रशासकाच्या निर्णयाविरोधात आक्रमक झालेत.

महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्रालयाने काढलेले पत्रक घटनाबाह्य असल्याचं म्हणत अण्णा हजारेंनी आंदोलनाचाही इशारा दिलाय. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आणखी एक आंदोलन मला करावं लागलं तरी संकोच वाटणार नाही, असा असं अण्णा हजारे म्हणाले.

5) गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

गुजरात भाजपनं प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांना निवडलं आहे. सी. आर. पाटील म्हणून ते गुजरातमध्ये ओळखले जातात. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

सी आर पाटील हे आता लोकसभेचे खासदार असून, खासदारांना शासकीय बंगल्याचे वाटप करणाऱ्या हाऊसिंग कमिटीचे ते अध्यक्षही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. मोदींच्या वाराणसी मतदारसंघातील कामावर देखरेखीचं कामही ते पाहत असत.

सी आर पाटील

फोटो स्रोत, Twitter/C R Patil

65 वर्षांचे सी आर पाटील हे मूळच महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील आहे.

2009 साली ते पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर सलग तिसऱ्यांदा म्हणजे 2019 सालीही ते खासदार म्हणून निवडून आले.

महाराष्ट्र भाजपची धुरा चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे, गुजरातमध्येही सी आर पाटील यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानं दोन राज्यात 'चंद्रकांत पाटील' नावाचेच भाजपचे अध्यक्ष असल्याचा अनोखा योगायोग पाहायला मिळतोय.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)