राजस्थानमध्ये नवी ऑडिओ टेप का गाजतेय? गजेंद्रसिंह शेखावत यांच्यावर आरोप

सचिन पायलट

फोटो स्रोत, PTI

राजस्थानात काँग्रेस पक्षात सुरू असणारा अंतर्गत वाद आणि राजकीय घडामोडी अजूनही सुरू आहेत.

राजस्थानच्या सत्ताधारी काँग्रेसचे प्रमुख व्हिप असणाऱ्या महेश जोशी यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG)ने 2 एफआयआर दाखल केले. व्हायरल झालेल्या ऑडिओ टेप्सचा यामध्ये उल्लेख आहे.

जयपूरमधल्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (SOG)चे आयजी अशोक कुमार राठोड यांनी पत्रकारांना सांगितलं, "गजेंद्रसिंह यांच्यासह तीन जणांविरुद्ध कलम 124 - A आणि 120 - B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या ऑडिओ टेप्सच्या आधारे ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे त्यांची सत्यता आता आमची टीम तपासून पाहील."

काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केलेल्या आरोपांचं केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी उत्तर दिलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

ते म्हणाले, "कोणत्याही चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे. या ऑडिओ टेपमधला आवाज माझा नाही."

गजेंद्रसिंह शेखावत हे काही बंडखोर आमदारांच्या मदतीने राजस्थानातलं सरकार पाडण्याचं प्रयत्न करत असल्याचा आरोप रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ऑडिओ टेप्सचा दाखला देत म्हटलं होतं.

शुक्रवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत सुरजेवाला म्हणाले, "मीडियातून काही ऑडिओ टेप समोर आल्या आहेत. यामध्ये तथाकथितरित्या काँग्रेस नेते आणि एका ज्येष्ठ भाजप नेत्याचं संभाषण ऐकू येतं. पैशांची देवाण-घेवाण होत असल्याचं यावरून स्पष्ट होतंय."

शेखावत

फोटो स्रोत, NURPHOTO

व्हायरल झालेल्या या ऑडिओ टेप्सचा दाखला देत सुरजेवाला यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत,भाजप नेते संजय जैन आणि काँग्रेस आमदार भंवरलाल शर्मांच्यावर FIR दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली.

ते म्हणाले, " ही चर्चा ऐकून हे स्पष्ट होतंय की तिघे मिळून राजस्थान सरकार पाडायचा प्रयत्न करत होते. ऑडिओ टेप खरी आहे का आणि किती जुनी आहे याची तपासणी स्पेशल ऑपरेशन ग्रुप करेल. आमदार विकत घेण्यासाठीचा काळा पैसा कुठून आला याचीही चौकशी व्हायला हवी."

काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीचं नेतृत्त्व करणाऱ्या सचिन पायलट यांना सुरजेवालांनी सांगितलं, "खरेदी व्यवहारासाठी आमदारांची यादी त्यांनी भाजपला दिली होती की नाही हे त्यांनी समोर यावं आणि सार्वजनिक रित्या स्पष्ट करावं."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

बंडखोर आमदार भंवरलाल आणि विश्वेंद्र सिंह यांचा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांचं काँग्रेस पक्षातलं प्राथमिक सदस्यत्व निलंबित करण्यात आल्याचं सुरजेवाला यांनी सांगितलंय. या दोन्ही नेत्यांना कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली आहे.

आपल्यालाही प्रलोभनं दाखवण्यात आली होती आणि व्हायरल झालेल्या टेपमध्ये त्यांचं नाव ऐकू येत असल्याने याविषयीचं स्पष्टीकरण देत असल्याचं या पत्रकार परिषदेसाठी हजर असलेले काँग्रेस नेते चेतन डूडी यांनी म्हटलंय.

सचिन पायलट आणि इतर बंडखोर काँग्रेस आमदारांच्या याचिकेवर शुक्रवारी राजस्थान हायकोर्टात सुनावणी होणार आहे. विधासनभा अध्यक्षांनी बजावलेल्या नोटीशीला या बंडखोरांनी न्यायलयात आव्हान दिलं आहे.

बहुमत कोणाकडे?

सचिन पायलट यांनी बंडखोरी करूनही मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याकडे सरकार चालवण्यासाठीचं बहुमत आहे. पण काही लोक कमी झाल्यास त्यांचं सरकार अडचणीत येऊ शकतं.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

आपल्याकडे 106 आमदार आहेत आणि राजस्थानात बहुमतासाठीच्या 101 जागांपेक्षा आपल्याकडे पाच जण अधिक असल्याचं गहलोत समर्थकांचं म्हणणं आहे. राजस्थान विधानसभेत एकूण 200 जागा आहेत.

पायलट यांच्या गटाने सोमवारी मुख्यमंत्री गहलोत यांना 106 आमदारांचा पाठिंबा आहे का, याविषयी शंका व्यक्त केली होती.

ते म्हणाले, "त्यांच्याकडे 106 आमदार असतील तर त्यांच्याकडे संख्याबळ आहे. मग असं असताना आमदारांना एका हॉटेलमध्ये डांबून ठेवण्याची त्यांना गरज का?"

मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये अशोक गहलोत समर्थकांची संख्या 102 होती.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

काँग्रेसला आतापर्यंत 102 आमदारांचा पाठिंबा होता. यामध्ये 107 काँग्रेसचे आणि 15 अपक्ष आमदार होते. पण सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे हे समीकरण बिघडलं.

राजस्थान सरकारचे दोन कॅबिनेट मंत्री - विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा हे दिल्लीत बसून सचिन पायलट यांच्या विजयाचं भाकित करत असल्याचं सांगितलं जात होतं. या दोघांवरही पक्षाने कारवाई केलीय.

गेल्या आठवड्यातल्या या घडामोडींनंतर अशोक गहलोत यांच्याकडे 102 आमदारांचा पाठिंबा असू शकतो. यात काँग्रेसचे 90, अपक्ष 7 आणि 5 लहान पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे.

हे लहान पक्ष आहेत - सीपीएम, बीटीपी आणि आरएलडी. पण भारतीय ट्रायबल पार्टी (बीटीपी)ची भूमिका अचानक महत्त्वाची झाली आहे.

आपल्या आमदारांनी कोणाचीही बाजू घेऊ नये असं सोमवारी बीटीपीने म्हटलं होतं. पण नंतर बीटीपीचे दोन आमदार सरकारच्या बाजूने असल्याचा दावा काँग्रेसने केला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)