कल्याण, डोंबिवलीमध्ये लॉकडाऊन वाढवला

कल्याण आणि डोंबिवली शहरातील लॉकडाऊन आणखी एका आठवड्यानं वाढवण्यात आला आहे. चालू लॉकडाऊनची मुदत 12 जुलै रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत होती. मात्र, आता त्यात वाढ करून 19 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 13 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यासंबंधीचं पत्रक नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी प्रसिद्ध केलं आहे.

या पत्रकानुसार, नवी मुंबई महापालिका हद्दीत 3 जुलैच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 13 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे.

ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, मीरा भाईंदर महापालिकांनीही आपल्या हद्दीत लॉकडाऊन जाहीर केले आहेत. ठाणे, कल्याण - डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये 3 जुलैपासून 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे, तर पनवेलमध्ये 3 ते 13 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय तिथल्या महानगरपालिकेने घेतला आहे.

नवी मुंबईमध्ये काय बंद राहणार?

1. अत्यावश्यक व नाशवंत वस्तूंची ने-आण करण्याला परवानगी

2. अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेली ठिकाणे, बसेस वगळता इतर इंटरसिटी, MSRTC बसेस आणि सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी नाही.

3. टॅक्सी-ऑटोरिक्षा यांना परवानगी नाही. आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी मात्र परवानगी असेल.

4. सर्व आंतरराज्यीय बस आणि प्रवासी वाहतूक सेवांचे कामकाज बंद.

5. सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक बाबींच्या खरेदीसाठी 5 पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास निर्बंध.

6. सरकारी कार्यालयं कमीतकमी कर्मचाऱ्यासह ऑपरेट करण्याची परवानगी

नवी मुंबईमध्ये काय सुरू राहणार?

1. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं यात दूध, किराणा दुकान, बेकरी , भाजीपाला इ. खाद्यपदार्थांची दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील.

2. दूध विक्रीची दुकानं सकाळी 5 ते 10 या कालावधीत सुरू ठेवता येईल.

3. बँका आणि एटीएम्स सुरू राहणार.

4. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे

5. आयटी, टेलिकॉम, टपाल सेवा, इंटरनेट आणि डेटा सेवा

6. पुरवठा साखळी व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक

7. कृषी वस्तू व उत्पादनं, या सर्व वस्तूंची आयात आणि निर्यात

8. अन्न आणि वैद्यकीय उपकरण यासह आवश्यक वस्तूचं वितरण

9. फार्मासुटिकल्स मॅन्यूफॅक्चरिंग, त्यांचा व्यापार आणि वाहतूक

10. पेट्रोल पंप, एलपीजी, गॅस, तेल एजन्सी, त्यांची गोदाम आणि संबंधित वाहतूक कार्य

पनवेल महापालिकेतही 14 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी यासंबंधीचं पत्रक जारी करत म्हटलंय की, पनवेल महापालिका हद्दीत 3 जुलै संध्याकाळी 9 वाजेपासून ते 14 जुलैच्या सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करत आहेत.

पनवेलमध्ये काय बंद राहणार?

1. अत्यावश्यक सेवा आणि नाशवंत वस्तूंची ने-आण करण्याशिवाय इतर सर्व कारणांकरता पनवेल महापालिका हद्दीत लॉकडाऊन असेल.

2. शहर परिवहन बससेवा, टॅक्सी, ऑटो रिक्षा यांना परवानगी नसेल. आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी मात्र परवानगी असेल. यासाठी रिक्षात एक चालक आणि एक प्रवासी नेण्याची मुभा असेल.

3. खासगी ऑपरेटरकडून सुरू असलेल्या सर्व आंतरराज्यीय बस आणि प्रवासी वाहतूक बंद.

4. सार्वजनिक ठिकाणी अत्याश्यक बाबींच्या खरेदीसाठी 5 हून अधिक जणांना परवानगी नाही.

5. रुग्णालय आणि मेडिकल व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकानं सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळात चालू राहतील.

6. रुग्णालय, वैद्यकीय सेवा आणि औषधाची, रुग्णसेविका 24 तास सुरू ठेवण्याची मुभा असेल.

7. व्यावसायिक आस्थापनं कार्यालय आणि कारखाने, कार्यशाळा, गोदामं बंद.

8. सरकारी कार्यालय शासनानं ठरवून दिलेल्या कर्मचारी संख्येनुसार चालतील..

पनवेलमध्ये काय सुरू राहणार?

1. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं यात दूध, किराणा दुकान, बेकरी , भाजीपाला इ. खाद्यपदार्थांची दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील.

2. दूध विक्रीची दुकानं सकाळी 5 ते 10 या कालावधीत सुरू ठेवता येईल.

3. बँका आणि एटीएम्स सुरू राहणार.

4. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे

5. आयटी, टेलिकॉम, टपाल सेवा, इंटरनेट आणि डेटा सेवा

6. पुरवठा साखळी व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक

7. कृषी वस्तू व उत्पादनं, या सर्व वस्तूंची आयात आणि निर्यात

8. अन्न आणि वैद्यकीय उपकरण यासह आवश्यक वस्तूचं वितरण

9. फार्मासुटिकल्स मॅन्यूफॅक्चरिंग, त्यांचा व्यापार आणि वाहतूक

10. पेट्रोल पंप, एलपीजी, गॅस, तेल एजन्सी, त्यांची गोदाम आणि संबंधित वाहतूक कार्य

ठाण्यात 2 जुलैपासून पुढील 10 दिवस ठाणे शहरात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ठाण्यात काय सुरू राहील?

  • बँका, एटीएम्स, विमा संबंधित कार्यालयं
  • प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं
  • आयटी आणि आयटीईएस, टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवांसह
  • पुरवठा साखळी आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक
  • कृषी वस्तू आणि उत्पादने यांची वाहतूक, आयातनिर्यात
  • अन्न, फार्मा आणि वैद्यकीय उपकरणं
  • पाळीव प्राण्यांसाठी बेकरी आणि पशुवैद्यकीय आस्थापनं
  • रुग्णालयं, फार्मसी आणि ऑप्टिकल स्टोअर्स.
  • फार्मा मॅन्युफॅक्चरिंग, व्यापार आणि वाहतूक
  • पेट्रोलपंप, एलपीजी गॅस, तेल एजन्सी, गोदामं आणि संबंधित वाहतूक कार्य
  • सर्व सुरक्षा आणि सुविधा व्यवस्थापन सेवा
  • आवश्यक सेवांसाठी सहाय्यकारी यंत्रणा
  • मद्यविक्रीची दुकानं होम डिलिव्हिरीसाठी उपलब्ध
  • लग्नविषयक कार्यक्रमाला पन्नास माणसांच्या उपस्थितीला परवानगी

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)