कोरोना : अभिनेता सोनू सूद पॉझिटिव्ह, चाहत्यांना दिला 'हा' संदेश

@SonuSood

फोटो स्रोत, @SonuSood

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

अभिनेता सोनू सूद याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सोनू सूदनं सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे.

सोनू सूदनं ट्वीट करून सांगितलं की, "नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय. त्यामुळे मी स्वत:ला क्वारंटाईन केलंय."

तसंच, "काळजीचं काही कारण नाही. उलट तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आता माझ्याकडे अधिकचा वेळ असेल. लक्षात ठेवा, कुठलीही समस्या असली, तर मी तुमच्या सोबत आहे," असंही सोनूनं पुढे म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

सोनू सूद अभिनेता की नेता?

दरम्यान, गेल्यावर्षी देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेकांनी गरजूंना विविध मार्गांनी मदतीचा हात पुढे केला. पण सर्वाधिक चर्चा झाली ती अभिनेता सोनू सूद यानं केलेल्या मदतकार्याची. सिनेमातला व्हिलन ते रिअल लाईफमधला हिरो या शब्दात सोनूचं कौतुक झालं. पण सोनू सूदचं मदतकार्य आता वादात सापडलं आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून अभिनेता सोनू सूद मुंबईत लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घरी पोहोचवण्याचं काम करत आहे. सोनूनं बिहार, आसाम,उ त्तर प्रदेशसह अनेक राज्यांमधील मजुरांना स्वगृही पाठवलं.

सोनू सूदची मदत घेण्यासाठी लोक त्याला ट्विट करतात. अनेकांनी तर बाहेरगावी जाणाऱ्या लोकांची यादीही त्याला ट्विटवर दिली आहे. सरकारकडून वाहतुकीसाठी रेल्वे सुरू झाली नव्हती, तेव्हाही सोनू सूद मजुरांना घरी पाठवण्यासाठी बसचं नियोजन करत होता.

कोरोना
लाईन

सोनूचे 'फिल्मी' करिअर

सोनू सूदने हिंदी, इंग्रजी, तेलगू, तामिळ, कन्नड, पंजाबी आणि चीनी सिनोमात काम केलं आहे. 1999 साली 'कल्लाझागर' या तामिळ सिनेमापासून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

सोनू सूद

फोटो स्रोत, ANI

सोनू सूद मुळचा पंजाबचा असून गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईत राहतोय. त्याच्या वडिलांचा व्यवसाय असून आई प्राध्यापिका होती. सोनूने नागपूरच्या इंजिनिअरींग महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनतर सोनूने मॉडेलिंग आणि सिनेमात काम करण्यासाठी मुंबई गाठली.

मुंबईत काम मिळवण्यासाठी संघर्ष सुरू झाला. त्यावेळी नोकरी करून सोनू सिनेमात संधी मिळवण्यासाठी धडपड करत होता. पण पहिली संधी सोनूला एका जाहिरातीसाठी दिल्लीत मिळाली. त्यानंतर त्याने तामिळ सिनेमात एक भूमिका केली.

कोरोना
लाईन

त्यानंतर त्याने तामिळ, तेलगू, कन्नड या सिनेमांमध्ये अभिनयाला सुरुवात केली. त्यासाठी या भाषा त्याला शिकाव्या लागल्या. 2002 साली 'शहिद-ए-आझम' या हिंदी सिनेमातून सोनूने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर युवा,आशिक बनाया आपने, शूट आऊट अॅट वडाला, जोधा अकबर, दबंग, हॅप्पी न्यू ईयर, पलटन, आर राजकुमार अशा काही हिंदी सिनेमांमध्ये काम केलं.

चीनी सिनेमात काम

सोनू सूदने चीनी भाषेतल्या सिनेमातही काम केलं आहे. 2017 मध्ये 'कुंग फू योगा' या सिनेमात सोनूने अभिनय केला आहे. यासाठी जॅकी चॅनच्या मुलासोबत त्याने चीनमध्ये प्रशिक्षण घेतलं होतं. या सिनेमासाठी सोनूसोबत जॅकी चॅन यांनी भारतातही प्रमोशन केलं होतं.

1996 मध्ये सोनूने त्याची मैत्रीण सोनालीशी लग्न केलं. नागपूरमध्ये शिकत असताना सोनू आणि सोनालीची भेट झाली. त्यांना इशांत आणि अयान अशी दोन मुलं आहेत.

यापूर्वीही सामाजिक कार्य

अभिनेता सोनू सूद याने केलेल्या मदतकार्यामुळे तो प्रकाशझोतात आला असला तरी हे त्याचे पहिलं समाजिक कार्य नाही. अॅसिड हल्ल्यातील पीडितांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे कमही सोनू करतो. त्यांच्यावर उपचार आणि त्यांच्या कुटुंबाला मदत करत आला आहे. शिवाय, गुरुद्वारातही तो गरिबांना मदत करतो.

@SonuSood

फोटो स्रोत, @SonuSood

बॉलिवुड कव्हर करणाऱ्या पत्रकार मधू पाल यांनी सांगितलं, "सोनू सूद कायमच साधेपणानं वागतो. त्याच्या घराबाहेर पत्रकार, फोटोग्राफर असतील तर त्यांना तो घरी बोलवतो. गणेशोत्सव कव्हर करण्यासाठी घराखाली उभे असलेल्या पत्रकारांनाही दर्शन घेण्यासाठी वर बोलवतो. त्याचा स्वभाव कायमच असा राहिला आहे."

सोनूच्या ट्विटर अकाऊंटचे ट्विट डिलीट का होत आहेत?

कुणालाही राज्याबाहेर आपल्या घरी परतायचं असेल तर ती व्यक्ती सोनू सूदला ट्विट करते. ट्विट पाहताच 'उद्या तू घरी असशील' असा रिप्लायही सोनूकडून दिला जातो.

पण आता सोनू सूदच्या ट्विटर हँडलवरून बरीचशी ट्विट गायब असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्याच्या ट्विटर अकाऊंटवर गेल्यावर लक्षात येतं की अनेक लोकांनी ट्विट केलं होतं पण आता ते डिलीट केले आहेत. त्यावर सोनूने दिलेला रिप्लाय मात्र तसाच आहे.

राजकीय वाद

प्रतिकूल परिस्थितीमध्येही शेकडो मजुरांना घरी पोहचवल्यामुळे सोनू सूदच्या मदतकार्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप करण्यात येतोय.

सोनू सूद निवडणुकीत भाजपचा स्टार प्रचारक म्हणून दिसेल असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

@SonuSood

फोटो स्रोत, @SonuSood

'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून संजय राऊत यांनी सोनूच्या मदतकार्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोनू सूद हा चांगला अभिनेता आहे. तो जे काम करतोय, ते चांगलंच आहे. पण त्यामागे कोणी 'राजकीय दिग्दर्शक' असण्याचीही शक्यता असल्याचं राऊत यांनी म्हटलं. यावरून राजकीय वादाला सुरुवात झालीय.

संजय राऊत यांनी सोनू सूदच्या कामाविषयी घेतलेल्या आक्षेपांबद्दल काँग्रेस नेते संजय निरुपम

यांनी पलटवार केलाय. मोठ्या मनानं त्याचं कौतुक करण्यापेक्षा शिवसेना त्याच्यावर टीका करत आहे. स्थलांतरित मजुरांच्या मद्द्यावर आपलं अपयश लपवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची गरज नाही, अशी टीका निरूपम यांनी ट्विटवरून केलीय.

तर मनेसेनेही या वादात उडी घेतलीय. तुम्ही अग्रलेख लिहिण्यापलिकडे काय केलंत? असा प्रश्न मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी विचारला आहे.

विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेची टीका म्हणजे चर्चेत राहण्याचा प्रयत्न असं म्हटलंय.

सोनू सूदनं काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली हेती. 'सामाना'तून झालेल्या टीकेनंतर सोनूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

याचा उल्लेख सोनूने आपल्या एका ट्विटमध्येही केला आहे. अनेक लोक ट्विटवर विनंती करून ट्विट डिलीट करतात. त्यामुळे अनेक लोकांचे ट्विट नकली असल्याचा अंदाज येतो, असंही सोनूने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सोनूचे राजकीय संबंध

2018 मध्ये तत्कालीन वनमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवर याच्या एका कार्यक्रमाला सोनूने हजेरी लावली होती. चंद्रपूर येथे पालकमंत्री चषक सामन्यांच्या बक्षीस वितरण समारंभासाठी सोनू सूद उपस्थित होता. त्याच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आलं होतं.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचीसुद्धा सोनूनं काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्याचे फोटो त्यानं ट्विट केले होते.

Aaditya Thackeray

फोटो स्रोत, Aaditya Thackeray

पण बॉलिवुड कव्हर करणाऱ्या पत्रकारांनुसार सोनू सूदला कधीही राजकारणात रस नव्हता

"सोनू सूद राजकारणात जाईल असं वाटत नाही. त्याचे फार कुणाशी राजकीय संबंध नाहीत. जरी त्याला ऑफर्स आल्या तरी सोनू स्विकारेल असं वाटत नाही. तो एक अभिनेता म्हणून समाधानी आहे," असं मत पत्रकार पराग छापेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

बॉलीवुड पत्रकार पूजा सामंत यांना यामागे श्रेयाचं राजकारण असल्याचं वाटतं. बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "सोनूच्या कामाचं कौतुक आहेच. पण पडद्यामागचे राजकीय धागेदोरे काय असू शकतात हे आपण सांगू शकत नाही. पण शिवसेना सोनू सूदवर टीका करण्यामागे श्रेयवादाचा मुद्दाही नाकारता येत नाही."

"शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही जे त्यांना जमलं नाही ते सोनू सूदने स्वतंत्रपणे करून दाखवल्यानेही शिवसेनेला अडचण असू शकते. सर्व श्रेय त्याला मिळत असल्यानेही राजकीय वाद सुरू झाल्याची शक्यता आहे," असंही मत पूजा सामंत यांनी मांडलं.

कोब्रा पोस्टच्या स्टिंगमध्ये सोनू सूदचं नाव

2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी कोब्रा पोस्टनं काही सेलेब्रिटींना 'एक्स्पोज्ड' केल्याचा दावा केला होता. त्यात सोनू सूदही होता. त्यावेळी सोनू सूद मोदी सरकारच्या 'HumFitTohIndiaFit' या अभियानाचा सदिच्छादूतही होता. त्यावेळी सोनू सूदनं त्याच्या सोशल मीडिया हँडल्सवरून भाजपचा फायदा होईल, असा मजकूर टाकण्याची तयारी दर्शवली होती, असं कोब्रा पोस्टच्या त्या वृत्तात म्हटलं होतं.त्यावेळी सोनू सूदने एक स्पष्टीकरण दिलं होतं की "अशा प्रकारच्या ऑफर वेगवेगळ्या ब्रँड्सकडून आम्हाला येतच असतात. आणि जे दाखवण्यात आलं आहे, ते एडिटिंगमध्ये काटछाट करून चुकीचा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला जातोय."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)