कोरोना व्हायरस : काही लोकांच्या चुकीसाठी संपूर्ण मुस्लीम समुदायाला नाव ठेवणं योग्य आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
हिमाचल प्रदेशमधल्या उना जिल्ह्यातल्या बनगढ गावात तर 37 वर्षीय मोहम्मद दिलशाद यांनी आपल्या घरात आत्महत्या केली.
काही दिवसांपासून त्यांना गावातल्या इतर लोकांचे टोमणे आणि भेदभावाला सामोरं जावं लागत होतं, कारण दिल्लीत झालेल्या तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांच्या ते संपर्कात आले होते.
दिल्लीत 15-17 मार्च मध्ये निजामुद्दीन या ठिकाणी जमाते इस्लामी या संस्थेचा एक धार्मिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी देशातील विविध भागांतून लोक आले होते. काही लोक इंडोनेशिया, मलेशियातूनही आले होते त्यांच्याकडून भारतातील लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आणि नंतर भारतातील हे लोक विविध भागांमध्ये गेल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये प्रसार झाला.
देशातील मुस्लीम समाजाला एकाच वेळी दोन गोष्टींचा सामना करावा लागत आहे. देशात कोरोना पसरण्याची किंवा लागण होण्याची भीती जितकी हिंदू, ख्रिश्चन किंवा शीख व्यक्तीला आहे तितकीच भीती मुस्लीम व्यक्तीलाही आहे पण निजामुद्दीनच्या घटनेनंतर देशभरातील सामान्य मुस्लिमांना आणखी एका समस्येचा सामना करावा लागत आहे. ती गोष्ट म्हणजे इस्लामोफोबिया. मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवणे, त्यांना लक्ष्य करणे.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

मुस्लिमांविरोधात फेक न्यूज पसरवणे, अपुरी माहिती देणे आणि त्यांचे जनरलायजेशन करणे या गोष्टी सोशल मीडियावर तर होतच आहेत पण काही वृत्तवाहिन्यांनी देखील मुस्लिमांना सरसकट लक्ष्य केलं आहे.
इस्लामोफोबिया म्हणजे काय, भारतात कोरोना व्हायरसच्या केसेसची संख्या वाढण्यासाठी मुस्लीम जबाबदार आहेत का, मुस्लिमांबद्दल बातम्यांमध्ये ज्या गोष्टी येत आहेत त्या खऱ्या आहेत, हे आपण या लेखात पाहूत.
इस्लामोफोबिया म्हणजे काय?
इस्लामोफोबियाचा शब्दशः अर्थ आहे इस्लाम मानणाऱ्यांची भीती बाळगणे.
बीबीसीच्या न्यूजराउंड या वेबसाइटने सांगितल्यानुसार इस्लामोफोबिया म्हणजे कुणी फक्त मुस्लीम आहे म्हणून गैरइस्लामिक व्यक्तीच्या रोषाला बळी पडणे. गैरइस्लामिक व्यक्ती किंवा समुदायाने बोलणे, टोमणे मारणे, अपमान करणे किंवा कधीकधी त्यांच्यावर हल्ले करण्याची क्रिया इस्लामोफोबिया आहे.
काही लोकांनी केलेल्या चुकीसाठी पूर्ण समुदायालाच जबाबदार धरून त्यांना लक्ष्य करणे 'इस्लामोफोबिया' आहे.
आधी मुस्लिमांना दहशतवादाच्या मुद्द्यावरून इस्लामोफोबियाला सामोरं जावं लागत होतं पण तबलीगीच्या घटनेनंतर मुस्लिमांकडे कोरोना व्हायरसचा प्रसार करणारे या नजेरतून पाहिलं जात आहे.
'वीजेचे दिवे बंद केले नाहीत म्हणून मारहाण'
5 एप्रिल रोजी संध्याकाळी नऊ वाजता सर्वांनी नऊ मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व विजेचे दिवे बंद करून बाल्कनीमध्ये मेणबत्ती, टॉर्चलाइट किंवा दिवे लावावेत, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यांच्या या आवाहनानंतर देशभरात अनेकांनी आपल्या घरातील विजेचे दिवे बंद करून पणत्या, मेणबत्त्या लावल्या. काही लोकांनी तर फटाके देखील फोडले.
पंतप्रधान मोदींनी सांगितलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही म्हणून हरियाणात बशीर खान आणि त्यांच्या भावांना बेदम मारहाण करण्यात आली.
एकाच कुटुंबातील चार जणांवर गावकऱ्यांनी हल्ला केला. सध्या जिंदमधल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बशीर खान यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, 5 एप्रिलला रात्री 9 वाजता ते पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाचं पालन करत होते. पण तेव्हा घराबाहेरचा बल्ब बंद न केल्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांना शिवीगाळ केली.
मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांच्या हिंदू शेजाऱ्यांना शिवीगाळीचं कारण विचारलं, तेव्हा शेजाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.
"आम्हा चारी भावांच्या हात, पाय, चेहरा आणि डोक्यावर जखमा झाल्या आहेत. धाकट्या भावाची परिस्थिती गंभीर आहे," बशीर सांगतात.
हिंदू शेजाऱ्यांनी वाद उकरून करण्याची ही पहिली वेळ नसल्याचंही बशीर म्हणतात. दिल्लीतल्या निझामुद्दीनमध्ये झालेल्या धार्मिक संमेलनानंतर त्यातले अनेक लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याची गोष्ट समोर आली, तेव्हाही त्यांचे शेजारी आणि त्यांच्यात भांडण झालं होतं. शेजाऱ्यांचं म्हणणं होती की निझामुद्दीनहून आलेल्या लोकांना बशीर यांनी आपल्या घरात आश्रय दिला होता, असं बशीर सांगतात.
या घटना फक्त विशिष्ट एकाच भागात होत आहे तर असं नाही तबलीगीच्या घटनेनंतर कर्नाटकातील मुस्लिमांचाही अपमान करण्यात आला. यासंबंधी एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओत मुस्लीम व्यक्ती हात जोडून विनवणी करताना दिसत आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बिदारी या गावात चार मासेमार गेले होते. त्यांच्यापैकी दोन हिंदू होते तर दोन मुस्लीम. त्यांना पाहून गावकरी म्हणाले तुमच्यामुळे कोरोना पसरत आहे.
दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन बागलकोटचे एसपी लोकश बी जगालसर यांनी केलं आहे. पाच जणांवर FIR करून त्यांना अटक करण्यात आली आहे. मासेमारांबरोबर जे झालं ते चुकीचं होतं असं ते म्हणतात.
'फेकन्यूजचे पीडित'
भाज्यांवर मुस्लीम थुंकत आहेत, पोलिसांवर एक व्यक्ती थुंकला आणि जेवण पॅक करताना मुस्लीम थुंकत आहेत असे व्हीडिओ सोशल मीडियावर सर्क्युलेट होताना दिसत आहेत.
पोलिसांवर खरंच ज्या तरुणाने थुंकला आहे तो तबलीगीशी संबंधित आहे, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. बीबीसी हिंदीने याचं फॅक्ट चेक केलं तेव्हा असं आढळलं की एका अंडरट्रायल कैद्याचा हा व्हीडिओ आहे. याचा तबलीगीशी संबंध नाही.
जेवण पॅक करताना मुस्लीम व्यक्ती थुंकला का हा व्हीडिओ इंडोनेशियातील आहे असं ऑल्ट न्यूजचे संस्थापक प्रतीक सिन्हा यांनी बीबीसीला सांगितलं. ऑल्ट न्यूज हे पोर्टल फेकन्यूज ओळखण्याचं काम करतं. प्रतीक सांगतात, "तबलीगीच्या घटनेनंतर असे जुने व्हीडिओ सर्क्युलेट होण्याचं प्रमाण वाढलं आहे. हे मुद्दामहून केलं जात आहे."
मीडियामधूनही होत आहेत मुस्लीम टार्गेट
तबलीगी जमातच्या कार्यक्रमाच्या घटनेनंतर काही वृत्तवाहिन्यांनी 'कोरोना जिहाद' हा शब्द वापरला.
तबलीगी जमातच्या कार्यक्रमाला आलेल्या लोकांपैकी 400 हून अधिक लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
दिल्लीतील निजामुद्दीन येथे जमलेले लोक देशातील विविध भागात गेले तिथून त्या त्या राज्यातील लोकांची चाचणी केली असता त्यात 400 हून अधिक लोक पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती त्यांनी दिली.
व्यक्ती किंवा समुदायाची ओळख जाहीर होईल असं काही करू नका असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. पण त्यांच्याच आरोग्य विभागाच्या सचिवांनी हे सांगितलं तबलीगी जमातमधील रुग्णांची संख्या किती आहे.
तबलीगी जमातीतील लोकांना कोरोनाची बाधा झाला हे म्हणणं सॅंपलिंग बायस आहे, असं मत 'स्क्रोल' या वेबसाइटवर मांडण्यात आलं आहे.
सॅंपलिंग बायस म्हणजे काय?
गेल्या काही दिवसांतील माध्यमांमध्ये झळकलेल्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. ज्यात ते सांगत आहेत गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाच्या जितक्या केसेस आढळल्या त्यापैकी 95 टक्के केसेस या तबलीगी जमात शी संबंधित आहे. किंवा पूर्ण देशात एकूण कोरोनाच्या केसेस आढळल्या त्यापैकी 30 टक्के केसेस या तबलीगीशी संबंधित आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
पण या बातमीमध्ये असा मुद्दा मांडला आहे की जोपर्यंत तुम्ही देशातील किती लोकांची चाचणी घेतली ही आकडेवारी जाहीर करणार नाहीत तोपर्यंत तबलीगींमुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली असं म्हणणं अयोग्य आहे. म्हणजे तुम्ही ठरवून एखाद्या विशिष्ट समुदायाशी संबंधित लोकांच्या चाचण्या घ्याल आणि इतरांच्या घेणार नाहीत तर त्याच समुदायाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे असा निष्कर्ष निघू शकतो. त्यालाच सॅंपलिंग बायस किंवा चाचणीसाठी निवडण्यात येणाऱ्या नमुन्याबाबतचा पूर्वग्रह म्हणतात.
या पूर्वग्रहांमुळेच काही माध्यमांनी मुस्लीम समुदायाशी संबंधित बातम्यांना वेगळा रंग दिला आणि भडक, सनीसनीखेज वृत्तांकन केल्याचं स्क्रोलच्या या लेखात म्हटलं आहे.
फक्त माध्यमंच नाही तर काही राजकीय नेत्यांनी या समुदायातील लोकांवर टीका केली आहे.
राज ठाकरे यांचं वादग्रस्त विधान
मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार केलं पाहिजे, असं विधान मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितलं.
“मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांचे वैद्यकीय उपाचर बंद करायला हवे. यांना या दिवसांमध्येही देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल आणि आम्ही देश संपवू असं कारस्थान करायचं असेल… नोटांना थुंका लावत आहेत… भाज्यांवर थुंकत आहेत. नर्सेसमोर नग्न फिरत आहेत. या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत तर लोकांना विश्वास बसेल. याबद्दल पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.
'एका समुदायाला टार्गेट करू नका'
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस असं म्हणाले असले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे, की चुकीचे व्हीडिओ पसरवणारे आणि द्वेष पसरवणाऱ्या लोकांवर आम्ही कारवाई करू.
"महाराष्ट्राच्या एकीला कोणी नख लावण्याचा प्रयत्न करणार असेल तर सहन करणार नाही, जाणीवपूर्वक चुकीचे व्हीडिओ पसरवू नका, त्यांच्यावर कारवाई करु, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. समाजात काही विकृत व्हायरस आहेत. समाजात दुही माजवणाऱ्यांना माझ्या कायद्याच्या कचाट्यातून कुणीही वाचवू शकणार नाही." असं उद्धव ठाकरे म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या सारखीच भूमिका मांडली आहे.
"कोव्हिडचे गांभीर्य पाहता बहुतांशी लोकांनी सहकार्य केलेले आहे. निजामुद्दीन येथील गर्दीमुळे रोगाच्या प्रसाराबाबत चिंता निर्माण झाली. पण आता ते मागे ठेवून रोगप्रसार कसा रोखता येईल यावर लक्ष केंद्रित करावयास हवे. कोणत्याही समाजाला दोष देणे किंवा प्रसाराचा ठपका ठेवणे हे बरोबर नाही," असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
एखाद्या समाजाला टार्गेट करणं हे चुकीचं आहे असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही वाटतं पण त्यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे देखील म्हटलं आहे, की मुस्लीम बहुल वस्त्यांमध्ये लॉकडाउन नीट पाळलं जात नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
प्रत्येक रूग्ण हा पीडितच -WHO
व्यक्तीच्या धर्मावरून त्या व्यक्तीला टार्गेट करणे अयोग्य असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनी म्हटलं आहे. त्या व्यक्तीबरोबर भेदभाव करू नका असं WHO ने म्हटलं आहे.
WHOच्या आपात्कालीन कार्यक्रमाचे संचालक माईक रायन यांनी म्हटलं, "याने काहीही फायदा होत नाही. एखाद्या व्यक्तीला कोव्हिड-19चा संसर्ग झाला तर ती त्यांची चूक नाही. मुस्लिमांची राज्यनिहाय आकडेवारी जाहीर केली होती. प्रत्येक रुग्ण हा स्वतःच पीडित आहे, त्यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या कोणत्याही व्यक्तीला वंशाच्या, धर्माच्या किंवा इतर कुठल्या मुद्द्यावरून वेगळं करू नका, त्यांच्याबरोबर भेदभाव करू नका."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








