You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कमलनाथ यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा देणार असल्याचं म्हटलंय. राज्यपालांना भेटून राजीनामा द्यायचं मी ठरवलं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
भोपाळमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगवेगळे भाजपवर आरोप केले,
ते म्हणाले,
"माझ्या सरकारला अस्थिर करून भाजप मध्य प्रदेशच्या साडेसात कोटी जनतेसोबत विश्वासघात करत आहे. पहिल्या दिवसापासून भाजपनं आमच्या सरकारविरोधात कट कारस्थान केलं.
15 महिन्यांत मध्य प्रदेशाचा विकास करण्याचा मी प्रयत्न केला. यात माझी काय चूक होती.
या 15 महिन्यांत अडीच महिने लोकसभा निवडणुकीत गेले. भाजपला जनहिताचं काम आवडलं नाही. म्हणून ते माझ्याविरोधात कारवाया करत आहेत.
15 महिन्यांत शेतकऱ्यांसाठी काम केलं. माफियाराज हटवलं. पण, माफियांविरोधात कारवाई करू नये, असं भाजपला वाटत होतं. तरुणांना रोजगारासाठी युवा स्वाभिमान योजना आणली.
जवळपास 40 ते 45 वर्षं मी राजकारणात आहे. मी नेहमीच विकासाच्या संकल्पनेवर विश्वास ठेवला.
आम्ही खोट्या घोषणा नाही दिल्या. तर कामावर भर दिला."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)