समुद्र किनाऱ्यावर धावून पी. टी. उषानं कसं मिळवलं पदक?

    • Author, अरुण जनार्दन
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

35 वर्षांपूर्वी पी.टी. उषा चं ऑलिम्पिकचं पदक एका शतांश सेकंदाने हुकलं. 1984 च्या लॉस एंजिलिसच्या स्पर्धेत 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. ही सगळी प्रेरणादायी गाथा येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच महत्त्वाची आहे.

इतर खेळाच्या प्रकारांची तुलना केली असता पी.टी.उषामुळेच अॅथलेटिक्स प्रकारात महिलांनी कायमच प्राविण्य मिळवलं आहे. बीबीसीने केलेल्या एका विश्लेषणानुसार अॅथलेटिक्समध्ये महिलांनी 155 पदं जिंकली आहेत. त्यात नेमबाजीतच 137 पदकं मिळवली आहेत. बॅडमिंटन आणि कुस्तीत अनुक्रमे 70 आणि 69 पदकं मिळवली आहेत.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 1951 पासून भारतीय महिलांनी एकूण 694 पदं मिळवली आहेत. त्यात 256 कांस्य, 238 रौप्य आणि 200 सुवर्णपदकांचा समावेश आहे. 2018 मध्येच महिलांनी 174 पदकं जिंकली आहेत.

आतापर्यंत पाच महिलांनी ऑलिम्पिकमध्ये पदकं जिंकली आहेत. मात्र त्यात एकही मैदानी खेळाचा समावेश नव्हता. आशियाई स्पर्धांमध्ये महिलांनी 109 पदं जिंकली आहेत. कोणत्याही क्रीडाप्रकारापेक्षा ही संख्या खचितच जास्त आहे.

या उत्तम कामगिरीसाठी नक्की कारणं माहिती नसली तरी या यशासाठी अनेक गोष्टी जबाबदार आहेत.

अनेक प्रेरणास्थानं

1980 च्या दशकापासून 2000 च्या दशकापर्यंत काळात एम.डी.वलसम्मा, शायनी विल्सन, के.एम. बिनामोल, आणि अंजू बॉबी जॉर्ज यांचा समावेश आहे. 2003 मध्ये पॅरिसमध्ये जागतिक अॅथलेटिक्स प्रकारात पदक मिळवणारी ती एकमेव महिला आहे.

केरळमधल्या या महिलांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी केली आहेच. मात्र भारतासारख्या देशात पुरुषांच्या वर्चस्वाला त्यांनी तडा दिला आहे.

" पी.टी.उषा आणि अंजू बॉबी जॉर्ज या क्षेत्रात आदर्श आहेत. जर साधारण कुटुंबातील महिला हे करु शकतात तर आपणही हे करु शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. त्यासाठी अपार कष्टांची गरज असते." असं भारताची आघाडीची भालाफेकपटू अन्नू राणी म्हणते.

तुम्ही श्रीमंत असण्याची गरज नाही

या खेळात लोकप्रियता किंवा प्राविण्य मिळवण्यासाठी फारशा संसाधनाची गरज नसते. उषा समुद्रकिनाऱ्यावर धावायची. लाटांमुळे येणाऱ्या वादळाच्या विरुद्ध दिशेला धावण्याचा ती सराव करायची.

भारतात अगदी तरुण वयापासून मुलं वार्षिक स्पर्धामुळे भाग घेत असतात. केरळ, पंजाब, महाराष्ट्र, बंगाल, दिल्ली, उत्तर प्रदेश, आणि तामिळनाडू या राज्यात पुरुष महिला स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. असं कोझिकोडमधील उषा स्कूल ऑफ अॅथलेटिक्सचे सह संस्थापक व्ही. श्रीनिवासन सांगतात.

पोशाखाचं बंधन नाही

जिन्मॅस्टिक्स, जलतरण या खेळात भारतीय स्त्रियांना पोशाख हा मोठा अडथळा आहे. त्यामुळे हे खेळ मोठ्या शहरांपुरतेच मर्यादित राहतात. असं त्यांना वाटतं.

इंटरनेट, टीव्ही, सोशल मीडिया, आणि शिक्षण यांच्यामुळे स्त्रियांना वेगवेगळ्या देशांची संस्कृती पहायची संधी मिळते. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे लिंगभेदाशी सामना करण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होतो.

व्यवस्था सुधारत आहे

केंद्र सरकारने क्रीडा क्षेत्रात येण्यासाठी मुलींना कायमच प्रोत्साहन दिलं आहे. स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडियासारख्या संस्थेत महिलांना हॉस्टेल फी नसते. असं श्रीनिवासन सांगतात. यामुळे महिलांचा सहभाग वाढला आहे.

"आम्ही शाळांमध्ये जेव्हा निवड प्रक्रिया राबवतो त्यात प्रत्येक वर्षी स्पर्धकांची संख्या वाढतच आहे. दहा वर्षांपूर्वी इतर राज्यातून कमी मुलं यायची आणि केरळमधून मात्र अनेक मुलं यायची. गेल्या तीन वर्षांत हा ट्रेंड बदलला आहे. केरळच्या बाहेरूनही अनेक लोक येत आहेत." असं श्रीनिवासन म्हणाले. ते उषा यांचे पती होते.

त्यांच्या शाळेत गेल्याच आठवड्यात निवड प्रक्रिया पार पडली. त्यातून 17 लोक निवडले गेले आहेत. त्यापैकी 10 लोक बाहेरच्या राज्यातील आहेत.

मोठा पल्ला बाकी आहे.

स्पर्धकांची संख्या वाढली, लोकांची मनोवृत्ती बदलली तरी भारताला अजूनही मैदानी खेळात एकही पदक मिळालेलं नाही. फारशी स्पर्धा नसल्यामुळे असं होत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

"केंद्र, राज्य सरकार, खासगी संस्था, अशा अनेक संस्था अगदी शास्त्रीय पातळीवर प्रशिक्षण देत आहे. अमेरिका आणि युरोपसारख्या देशांशी तुलना केली तर 14 वर्षाखालच्या गटात एक मोठी स्पर्धा आहे." असं श्रीनिवासन म्हणाले.

त्यामुळे भारताच्या स्पर्धकाना त्यांच्यापेक्षा उच्च दर्जाच्या लोकांशी स्पर्धा करावी लागते. हे प्रत्येकालाच झेपतं असं नाही. असं दुती चंदच्या अनुभवावरून रमेश सांगतात.

"उच्च पातळीवर स्त्रियांचा एक वेगळ्या प्रकारचा आक्रमकपणा जाणवतो." असं राणी सांगते. भालाफेक स्पर्धेच्या जागतिक पातळीवर जाणारी ती पहिली महिला आहे. येत्या ऑलिम्पिक स्पर्धेत आम्ही अनेक पदकं मिळवू असं ती हसून सांगते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)