Budget 2020: निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणावर सोशल मीडियावर मीम्सचा पूर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन तास 40 मिनिटांचं भाषण करत येत्या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला.

अर्थसंकल्पातील तरतुदींमधल्या त्रुटींवर विरोधकांनी बोट ठेवलं, विश्लेषकांनी अर्थसंकल्पातून नेमकं काय साधणार याचं विश्लेषणही केलं.

काय महागलं? काय स्वस्त झालं? कर सवलती, सर्वसामान्यांचा खिसा भरला की कापला गेला, अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह सुरू असताना सोशल मीडियावरच्या वेगवेगळ्या मीम्सनं अर्थसंकल्पावर हलक्याफुलक्या, तिरकस शैलीत भाष्य केलं.

वेगवेगळ्या फिल्म्समधल्या गाजलेल्या डायलॉगपासून कार्टून्स, व्हीडिओ, जुन्या फोटांचा वापर करून हे मीम्स बनविण्यात आले.

मध्यमवर्गीयांना या अर्थसंकल्पातून काहीच हाती लागलं नाही, हे सांगणारे मीम्स काही युजर्सनं तयार केले.

अर्थमंत्र्यांनी करदात्यांसाठी ज्या सवलती दिल्या, त्यावरही अनेकांनी भाष्य केलं.

निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प खरंच समजला का, असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)