Aadhaar PAN: आधार-पॅन असं लिंक करा, आज शेवटची तारीख

फोटो स्रोत, Getty Images
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठीची मुदत आज संपत आहे.
आज म्हणजेच 31 मार्च रोजी करदात्यांनी आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक न केल्यास उद्यापासून यासाठी 500 रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे.
जून 2022 नंतर या सेवेसाठी 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
आयकर विभागानं यासंबंधीचं पत्रक जारी केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टानं आधार योजनेची घटनात्मक वैधता मान्य केली होती. तसेच, आयकर भरताना बायोमेट्रिक आयडी म्हणून आधार कार्ड आवश्यक असल्याचेही नमूद केले होते.
आधार कार्ड हे यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आणि पॅन कार्ड हे आयकर विभागाकडून देण्यात येते.
पॅन-आधार कसा लिंक कराल?
- यासाठी सगळ्यात आधी incometax.gov.in असं सर्च करा. त्यानंतर भारत सरकारच्या आयकर विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.
- त्यानंतर तिथे डाव्या बाजूस तुम्हाला विविध पर्यायांची यादी दिसेल. त्यातील 'Link Aadhar' या पर्यायावर क्लिक करा.

फोटो स्रोत, incometax.gov.in
- इथं सुरुवातीला पॅन कार्ड आणि आधार क्रमांक, त्यानंतर आधार कार्डवर जसं आहे तसं नाव मोबाईल नंबर टाकायचा आहे. शेवटी लिंक आधार या पर्यायवर क्लिक करायचं आहे.
- पॅन-आधार लिंक होण्यास काही वेळ लागतो. त्यामुळं लिंक झालंय की नाही, हे पाहण्यासाठी या ठिकाणी डावीकडे असलेल्या Link Aadhaar Status या पर्यायावरवर क्लिक करा. तिथं तुमचा आधार आणि पॅन क्रमांक टाकून तुम्ही तुमचं पॅन-आधार लिंक झालंय की नाही, ते पाहू शकता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)




