You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ठाकरे सरकार विश्वासदर्शक ठराव: भाजपचा सभात्याग, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या बहुमत चाचणीसाठी बोलावण्यात आलेलं अधिवेशन नियमबाह्य असल्याचं सांगत भाजप आमदारांनी सभात्याग केला.
संविधानाची पायमल्ली करून नियमबाह्य पद्धतीने कामकाज होत आहे. मागच्या बैठकीत राष्ट्रगीत झाल्यामुळे ते अधिवेशन संपलं होतं. नव्या अधिवेशनासाठी समन्स काढायला हव होत. हे अधिवेशन बेकायदेशीर आहे, असं आमचं मत आहे. मंत्र्यांनी घेतलेली शपथ अवैध आहे. शपथेच्या नमुन्याप्रमाणे शपथ घेतलेली नाही, अशी तक्रार विरोधी पक्ष भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
हे अधिवेशन आणि मुख्यमंत्र्यांची शपथ नियमबाह्य असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस आणि हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्यात खडाजंगी झाली.
सुमारे अर्धा तास विधानसभेत झालेल्या जोरदार गोंधळानंतर हंगामी अध्यक्षांनी विश्वासदर्शक ठरावासाठीचं मतदान घेतलं.
तोवर वाचा, बहुमत चाचणीचे आतापर्यंतचे सर्व ताजे अपडेट्स इथे -
हेही वाचलंत का?
(ही ब्रेकिंग न्यूज असून सतत अपडेट होते आहे)