मुंबई आणि परिसरात रेड अलर्ट, येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई आणि परिसरात सकाळपासूनच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक खोळंबली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. सर्व शाळांच्या प्राध्यापकांना मुलं सुखरूप घरी परततील, याची काळजी घेण्याचं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकने केलं आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने 4 सप्टेंबरला मुंबई, पालघर, रायगड, ठाणे आणि पुणे या पाच जिल्ह्यांमध्ये रेड अर्लट जाहीर केला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नंदुरबार, नाशिकसह कोकण आणि कोल्हापूरमध्ये गुरुवारीसुद्धा मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

मुंबईच्या सांताक्रूझ वेधशाळेत आज सकाळी 8.30 ते दुपारी 2.30 दरम्यान 206.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

त्यामुळे मुंबईकरांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे.

पावसाचा परिणाम रस्ते आणि रिल्वे वाहतुकीवरसुद्धा झाला आहे.

पावसाचा फटका अनेक गणपती मंडळांना देखील बसला आहे. काही मंडळांच्या मंडपांमध्ये पाणी घुसलं आहे.

महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)