ONGC उरण: कोल्ड स्टोरेज प्लांटची आग '2 तासांतच नियंत्रणात'

फोटो स्रोत, ANI
रायगड जिल्ह्यातील उरणजवळच्या ONGCच्या कोल्ड स्टोरेज प्लांटला मोठी आग लागली. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
सकाळी सुमारे 7 वाजता ही आग लागली होती. ONGCच्या अग्निशमन दलाने दोन तासातच आग विझवल्याचं ONGCने ट्वीट करून सांगितलं.

फोटो स्रोत, Twitter / @ONGC_
"या प्लांटमध्ये वादळाचं पाणी काढण्यासाठी असलेल्या ड्रेनेजमध्ये आग लागली. दोन तासातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. ONGCच्या सक्षम आपत्ती निवारण व्यवस्थेमुळे एक मोठा अनर्थ कमी वेळातच टाळता आला."
मात्र या अपघातात चार जण ठार झाल्याचं पोलिसांनी PTI वृत्तसंस्थेला सांगितलं.

फोटो स्रोत, ANI
सकाळी सातच्या सुमारास आग लागल्याचं लक्षात आलं. आग मोठी असल्यानं प्रकल्पाच्या शेजारी नागावमध्ये जी घरं आहेत ती रिकामी करण्यास सांगण्यात आलं होतं. नवी मुंबई, उरण नगरपालिका, JNPTच्या फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या होत्या. आता आग पूर्णतः आटोक्यात आली आहे.ONGC हा अतिसंवेदनशील प्रकल्प उरणमध्ये आहे. तिथे आग लागण्याची ही पहिली घटना नाही. तीन-चारवेळा अशा घटना घडल्या आहेत. याआधीही स्फोट झाला होता, सिगरेटमुळे बाहेर लागलेली आग आता गेली होती.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरात सीएनजी गॅसच्या पुरवठ्यावर तसंच पाईपलाईनद्वारा होणाऱ्या घरगुती गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
"ओएनजीसीच्या उरणमधील गॅस प्रकल्पात आज सकाळी लागलेल्या आगीमुळे महानगर गॅस लिमिटेडच्या वडाळा येथील सिटी गेट स्टेशनला होणाऱ्या गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आम्ही घरगुती गॅस ग्राहकांना नियमित गॅस पुरवठा होत राहील याकडे प्राधान्य देत आहोत. पण मुंबईतली अनेक सीएनजी स्टेशन्स पाईपलाईनमधल्या कमी दबावामुळं बंद राहण्याची शक्यता आहे", असं महानगर गॅस लिमिटेडच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.
महानगर गॅस लिमिटेडनं औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांनी पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. तसंच ओएनजीसीकडून होणारा पुरवठा पूर्ववत झाल्यावर गॅसपुरवठा सुरळीत होईल असं म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईतील बससेवा पुरवणाऱ्या BEST वरही गॅसपुरवठा घटल्यास परिणाम होऊ शकतो. "सध्या पाईपमधील जो गॅस येत आहे त्यामधून आम्ही आमच्या बसगाड्यामध्ये गॅस भरत आहोत, तशा सर्व डेपोमध्ये सूचना देण्यात आल्या आहेत'' असं BESTचे मुख्य संपर्कअधिकारी हनुमंत गोफणे यांनी सांगितलं.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ONGCची गॅस पाईपलाईन गावातून, शेतातून थेट BPCLपर्यंत गेली आहे. ONGCचा हा प्रकल्पही पाच ते सहा किलोमीटर क्षेत्रावर वसला आहे.
इथे बाजूला JNPT आहे, BPCLपर्यंत गॅसची पाईपलाईन जाते, अनेक केमिकल टर्मिनल्स आहेत, नौदलाचं शस्त्रागार आहे. त्यामुळे हा परिसर अतिशय संवेदनशील आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








