You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 निकाल कधी लागणार?
राज्यातले विविध पक्षांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. 9 नोव्हेंबर 2019 मध्ये विधानसभेची मुदत संपणार आहे त्यामुळे त्याआधी निवडणुका होणं आवश्यक आहेत. राज्यात चार प्रमुख पक्षांवर सर्वांची नजर असणार आहे.
शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस याच बरोबर राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची या निवडणुकीत काय भूमिका असेल हे पाहणं देखील औत्सुकपूर्ण ठरेल.
2014 मध्ये भाजपचं सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेची पहिली बैठक 10 नोव्हेंबर 2014 रोजी झाली होती. त्यामुळे 9 नोव्हेंबर ही विधानसभेची मुदत आहे. गेल्या वेळी 15 ऑक्टोबरला निवडणुका झाल्या होत्या आणि 19 ऑक्टोबर रोजी निकाल लागला होता. 2014 मध्ये 12 सप्टेंबर रोजी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल म्हणजेच मतदानोत्तर कल चाचणीचे निकाल जाहीर करता येतात.
2014 च्या निवडणुकांमध्ये एकूण 4,119 उमेदवार उभे होते. त्यावेळी सर्वच पक्षांनी निवडणुका वेगवेगळ्या लढवल्या होत्या. भाजपचे 260 उमेदवार, शिवसेनेचे 282 उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे 287 आणि काँग्रेसचे 278 उमेदवार उभे होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी 220 उमेदवार उभे केले होते.
बहुजन विकास आघाडीचे 36, ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन (MIM) चे राज्यभरात 24 तर भारिप बहुजन महासंघाचे 70 उमेदवार रिंगणात होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)