You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्पाइस जेटचं विमान घसरलं, मुंबई विमानतळाचा मुख्य रनवे ठप्प
जयपूरहून मुंबईला येणारं स्पाइस जेटचं विमान सोमवारी रात्री रनवेवरच घसरलं. सुदैवानं या अपघातात प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही.
या घटनेनंतर एअरपोर्टचा मुख्य रनवे बंद करण्यात आला असून दुसऱ्या रनवेवरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. मुंबईतला मुसळधार पाऊस आणि मुख्य रनवे बंद असल्यामुळे 54 विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर 52 विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.
स्पाइस जेटचं विमान 0623 हे जयपूरहून मुंबईला येत होतं. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही फ्लाइट लँड करत असतानाच ही दुर्घटना घडली.
या विमानात 167 प्रवासी होते. स्पाइस जेटनं एक निवेदन प्रसिद्ध करून सर्व प्रवासी सुखरूप असल्याचं स्पष्ट केलं.
रनवे मोकळा करण्याचं काम वेगानं सुरू आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)