You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Exit Polls: नमो टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये 'भाजपला 542 पैकी 542 जागा' - सोशल
23 मे रोजी लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. आज शेवटच्या टप्प्यातले मतदान संपल्यावर एक्झिट पोल जाहीर झाले. सोशल मीडियावर याबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
हे एक्झिट पोल पाहिल्यावर EVM हॅक झाले आहेत, असा मत डॉ. अमित अरोसकर नावाच्या एका ट्विटर युजर यांनी व्यक्त केले आहे.
काही लोकांनी आता "नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील," असा संदेश देणारे ट्वीटस केले आहेत. अनंत प्रकाश यांनी "राजतिलक की करो तैयारी, आ गए फिर भगवाधारी," असं ट्वीट केलं आहे.
सर्व वाहिन्यांवर वेगवेगळे एक्झिट पोल आल्यानंतर कॉमेडियन अतुल खत्री यांनी नमो टीव्ही वाहिनीवर उपहासात्मक टीका केली आहे. "नमो टीव्हीवरच्या एक्झिट पोलचा अंदाज आहे की 542 पैकी 542 जागा भाजपला मिळतील," असं त्यांनी फेसबुकवर लिहिलं आहे.
अभिनेते दिग्दर्शक भरत दाभोळकर यांनी "या पोलनंतर आता विरोधी पक्ष 24 मे ऐवजी मे 24 मध्ये (पाच वर्षांनंतर 2024 मध्ये) बैठक होईल," असं लिहिलं आहे.
चौकीदार बिनय शर्मा यांनी ट्वीट केलंय की "एक्झिट पोलचे भाकीत पाहाता राहुल गांधी यांनी बद्रीनाथला गेलं पाहिजे आणि पाच वर्षे आत्मपरीक्षण केलं पाहिजे."
रॉक बिट्टो यांनी काँग्रेसच सरकार स्थापन करेल, असं मत व्यक्त केलं आहे. "माझ्या कल्पना जर बरोबर असतील आणि मतदान पारदर्शकरीत्या झालं असेल तर काँग्रसेला सरकार स्थापन होण्याएवढ्या जागा मिळतील," असं ट्वीटमध्ये लिहून बिट्टो यांनी मी हे पुन्हा रिट्वीट करेन असं लिहिलं आहे.
नायाब हुसेन यांनी एक्झिट पोलमध्ये प्रादेशिक पक्षांनी चांगली कामगिरी केली असल्याचं दिसत आहे, असं निरीक्षण नोंदवलं आहे.
ABP न्यूज टीव्हीने दिलेल्या माहितीमध्ये 47 टक्के मतं प्रादेशिक पक्षांना, भाजपला 31 टक्के आणि काँग्रेसला 22 टक्के मतं मिळतील, असं ट्वीट केलं आहे. तसंच दक्षिण भारतातील एखादा प्रादेशिक पक्ष किंगमेकर होईल असं दिसत असल्याचं ते म्हणतात.
"जोपर्यंत अंडी उबवली जात नाहीत तोपर्यंत कोंबड्यांची मोजणी करू नका," असं नीरज कुमार यांनी ट्वीट केलं आहे.
"एक्झिट पोल हे साधारणतः चुकीचे असतात. म्हणून मी 23 मे पर्यंत थांबेन. अर्थात मला NDA सरकार सत्तेत यावं असं वाटतं," असं तुषार कोतवाल यांनी ट्वीट केलं आहे.
तुम्हाला काय वाटतं या एक्झिट पोलबद्दल? या पोस्टवर कमेंट करा...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)