You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फॅक्ट चेक: राजीव गांधी आणि पी.व्ही. नरसिंह राव यांच्या फोटोमागचं सत्य
- Author, फॅक्टचेक टीम
- Role, बीबीसी न्यूज
माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि राजीव गांधी यांचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. त्या दोघांनी इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतर त्यांना इस्लामिक पद्धतीने श्रद्धांजली वाहिली असा दावा हा फोटो वापरून केला जात आहे.
या फोटोत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी दिसत आहे. त्यांच्याबरोबर पी.चिदंबरम सुद्धा मागे डाव्या बाजूला दिसत आहेत.
गांधी कुटुंबीयांनी इंदिरा गांधींना ज्याप्रकारे श्रद्धांजली वाहिली त्यावरून त्यांचा धर्म लक्षात येतो असंही या फोटो दाखवून म्हटलं जात आहे.
हा फोटो गेल्या तीन महिन्यांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. पण गेल्या काही दिवसांत हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या फोटोच्या सत्यतेची पडताळणी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा फोटो खोटा आहे.
वास्तव
रिव्हर्स इमेज सर्चने आम्ही पाकिस्तानातले राजकीय नेते मोहसीन डावर यांच्या ट्विटपर्यंत पोहोचलो.
त्यांच्या मते हा फोटो स्वातंत्र्यसेनानी खान अब्दुल गफार खान यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेचा आहे. ही घटना 21 जानेवारी 1988 पेशावर इथे घडलेली आहे.
Skyscrapercity या वेबसाईटवरही हा एक फोटो प्रकाशित झाला होता. हा फोटो खान यांच्या अंत्यसंस्काराचा आहे असा दावा केला आहे.
न्यूयॉर्क टाइम्स आणि LA टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या बऱ्याच लेखांनुसार असं लक्षात आलं की राजीव गांधी आपल्या कुटुंबीयांसकट त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते.
इंदिरा गांधींचे अंत्यसंस्कार
इंदिरा गांधीची हत्या 31 ऑक्टोबर 1984 ला त्यांच्याच अंगरक्षकांनी केली. 3 नोव्हेंबरला हिंदू पद्धतीनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या अंत्यसंस्काराचे अनेक व्हीडिओ उपलब्ध आहेत.
राजीव गांधी त्यांच्या आईच्या पार्थिवासमोर उभे दिसत आहे.
या फोटोंवरून असं कळतं की गांधी यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार झाले आहेत.
त्यामुळे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि नरसिंह राव यांनी इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर त्यांना इस्लामिक पद्धतीने श्रद्धांजली वाहिली या दाव्यात तथ्य नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)