You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नीरव मोदींच्या संग्रहातील ऐतिहासिक कलाकृतींचा लिलाव होणार
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याप्रकरणी अटक झालेले हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या संग्रहातील करोडो रुपये किमतीच्या चित्रांचा आज मुंबईत लिलाव होणार आहे.
यामध्ये राजा रविवर्मा आणि वासुदेव गायतोंडे यांच्यासह अनेक दिग्गज भारतीय चित्रकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे.
नीरव मोदीना जवळजवळ 13,000 कोटी रुपयांच्या गेल्या आठवड्यात लंडनमध्ये अटक करण्यात आली असून, त्यांच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी जानेवारीत हा घोटाळा समोर आल्यानंतर नीरव मोदी यांनी लंडनला पलायन केलं होतं.
त्यानंतर प्राप्तीकर विभागानं नीरव मोदींची मालमत्ता जप्त केली होती ज्यात जवळपास १७०हून अधिक महागड्या पेंटिंग्जचा समावेश होता.
या चित्रांची किंमत ५५ कोटींच्या घरात जाते असा जाणकारांचा अंदाज आहे. त्या चित्रांचा लिलाव करून नीरव मोदींनी करात बुडवलेला पैसा वसूल करण्यास मुंबईतील विशेष न्यायालयानं गेल्या आठवड्यात अंमलबजावणी संचलनालयाला परवानगी दिली.
त्यानंतर आता त्यातील ६८ चित्रांचा मुंबईत प्राप्तीकर खात्यातर्फे सॅफ्रनआर्ट या संस्थेच्या माध्यमातून लिलाव केला जाणार आहे. त्यात भारतीय चित्रकारितेत मोलाचं योगदान देणाऱ्या चित्रकारांच्या दुर्मिळ कलाकृतींचा समावेश आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)