You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'नीरव मोदी तुम्ही लंडनमध्ये कुठं राहता?'
पंजाब नॅशनल बँकेत जवळजवळ 13,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले हिरे व्यापारी नीरव मोदी यांना लंडनमध्ये पाहिल्याचं 'द टेलेग्राफ'नं म्हटलं आहे.
मोदी यांनी शहामृगाच्या चमड्यापासून (ostrich hide) बनवलेलं जॅकेट घातलं होतं. ज्याची किंमत जवळपास 9 लाख रुपये इतकी आहे.
टेलिग्राफनं नीरव मोदी यांना काही प्रश्न विचारले आणि संबंधित बातमी ट्वीट केली आहे.
टेलिग्राफचे पत्रकार मिक ब्राऊन आणि नीरव मोदी यांच्यामधील संभाषण पुढीलप्रमाणे :
प्रश्न - तुम्ही राजकीय आश्रय मिळवण्यासाठी अर्ज केला आहे, हे खरं आहे का?
उत्तर - सॉरी, नो कमेंट.
प्रश्न - तुम्ही अनेक लोकांचे पैसे देऊ लागता...
उत्तर - सॉरी, नो कमेंट.
प्रश्न - तुम्ही नेमके कुठे आहात, हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
उत्तर - सॉरी, नो कमेंट.
प्रश्न - तुम्ही इंग्लंडमध्ये किती दिवस राहणार आहात?
या प्रश्नावर नीरव यांनी काहीही उत्तर दिलं नाही.
प्रश्न - तुम्ही राजकीय आश्रयासाठी अर्ज केला आहे, असं सरकारी अधिकाऱ्य़ांचं म्हणणं आहे. तसंच तुमचं प्रत्यार्पण करा, असंही म्हटलं आहे. यावर काय सांगाल?
उत्तर - सॉरी, नो कमेंट.
प्रश्न - तुम्हाला काहीही सांगायचं नाहीये का?
या प्रश्नावर त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही.
प्रश्न - तुम्ही सध्या हिऱ्याचा व्यापार करत आहात का
उत्तर - नो कमेंट.
टेलिग्राफच्या या बातमीनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रतिक्रिया दिली आहे.
"नीरव मोदी इंग्लंडमध्ये आहे, हे आम्हाला माहितीये. पण ते तिथे दिसले याचा अर्थ त्यांना लगेच आणता येईल, असं नाही. आम्ही इंग्लंडला प्रत्यार्पणाची विनंती केली आहे," असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नीरव मोदी यांचा अलिबागमधला बंगला पाडण्यात आला आहे. सक्तवसुली संचलनालयानं हा बंगला जप्त केला होता. नंतर भरती-ओहोटीच्या क्षेत्रात असल्यानं हा बंगला पाडण्याचे आदेश देण्यात आले.
"हा बंगला पाडण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. सुरुवातीला जेसीबी, पोकलँडच्या साहाय्यानं बंगला पाडायचा प्रयत्न केला. परंतु बंगल्याचं स्ट्रक्चर खूप हेवी असल्यानं आम्हाला विद्यापीठाच्या लोकांनी सल्ला दिला की, कंट्रोल ब्लास्टिंग वापरा. त्यानंतर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून बंगला पाडण्याचं हे काम चालू होतं," असं रागयडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे.
'रुपान्य' नावाच्या या बंगल्याची किंमत अंदाजे 100 कोटी रुपये सांगितली जात होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)