You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोदी म्हणाले, 'चौकीदार जागा आहे तुम्ही निश्चिंत राहा'
तुम्ही निश्चिंत राहा, तुमचा चौकीदार टक्क जागा आहे.
मी भारताला जगळ्यात उच्च स्थानावर नेण्यासाठी दिवसरात्र काम करत आहे आणि ते लोक मला हटवण्यासाठी काम करत आहेत.
ज्यावेळी 'दहशतावादा'विरोधात कारवाई सुरू होती तेव्हा 21 विरोधी पक्ष निंदेचा प्रस्ताव संमत करवून घेत होते.
हे शब्द आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे. बिहारची राजधानी पाटण्यातील गांधी मैदानात ते बोलत होते. मोदी रविवारी गांधी मैदानात आयोजित केलेल्या संकल्प रॅलीत सहभागी झाले. तिथे ते निवडणूक प्रचारसभेत बोलत होते.
संकल्प रॅलीत भाजपशिवाय बिहारमध्ये NDAचा मित्रपक्ष असलेल्या जनता दल (संयुक्त) आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते सहभागी झाले होते.
गांधी मैदानात पंतप्रधान मोदी विंग कमांडर अभिनंदन यांच्या परतण्याचा उल्लेख केला. लोकांना घोषणा द्यायला लावल्या आणि विरोधी पक्षावर निशाणा साधला.
लष्कराचा वापर केला जात आहे- मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, "आमचं लष्कर सीमेपार जेव्हा 'दहशतवाद्यां'च्या विरोधात कारवाई करतात त्याचवेळी काही लोक असे काम करत आहेत ज्यामुळे पाकिस्तानच्या टीव्ही चॅनलवर लोक टाळ्या वाजवत आहेत. हे लोक लष्कराच्या मनोबलाचं खच्चीकरण केलं जात आहे."
मोदींनी एकदा पुन्हा स्वत:ला देशाचा चौकीदार म्हटलं लोकांना आश्वस्त राहण्यास सांगितलं. ते म्हणाले, "देशावर वाईट नजर ठेवणाऱ्या लोकांसमोर हा चौकीदार एक भिंत बनून उभा आहे. देशाच्या वंचितांनी शोषित, मध्यमवर्गीयांच्या हितासाठी जितकेही निर्णय घेतलं जाणं अपेक्षित आहेत ते घेतले जात आहेत आणि पुढेही घेतले जातील."
नितीश यांची स्तुती लालूंवर टीका
पंतप्रधान मोदींनी एका बाजूला नितीश कुमार उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांची स्तुती केली. लालू यादव आणि राष्ट्रीय जनता दलावर टीका केली.
ते म्हणाले, "'चारा घोटाळ्याच्या नावावर काय काय झालं आहे, ते बिहारच्या लोकांना चांगलंच माहिती आहे. आता मध्यस्थांच्या हातातून देश मुक्त करण्याची योजना तुमच्या चौकीदाराने सुरू केली आहे."
मत देण्याचं आव्हान
2019मध्ये जर भाजपला मत दिलं तर विकासाची कामं होतील असं मोदी म्हणाले. ते म्हणाले, "मी सरकारचा जो यशस्वी लेखाजोखा मांडला तो तुमच्या मतांमुळेच शक्य झाला आहे. 2019 पर्यंतची वेळ गरजा पूर्ण करायची होती आणि 21 व्या शतकात नव्या उंचीवर नेण्याचा पुढचा काळ आहे.
पावसामुळे गोंधळ
मोदी सभेला संबोधित करण्यासाठी उभे राहिले. हिंदी, भोजपुरी, मैथिली भाषेत ते लोकांना 'नमस्कार' करत होते, तेवढ्यात अचानक लोक सैरावैरा धावायला लागले. जोरात पाऊस आला होता. मोदी भाषण करत होते आणि पावसाचा जोरही वाढत होता. जे लोक अगदी पुढे बसले होते, ते निघू शकले नाहीत. मात्र मागे बसलेले लोक पावसापासून वाचण्यासाठी मैदानाबाहेर जायला लागले. मोदींनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. थोड्यावेळात पाऊस थांबला मात्र तोपर्यंत गांधी मैदानावरील गर्दी ओसरली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)