You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Abhinandan यांच्या पत्नीला नरेंद्र मोदी यांनी फोन केल्याचा तो व्हीडिओ खोटा - फॅक्ट चेक
- Author, फॅक्ट चेक टीम
- Role, बीबीसी न्यूज
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनव यांच्या तथाकथित पत्नीचे दोन व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. खोटे दावे करून हे दोन्ही व्हीडिओ व्हायरल केले जात आहेत.
बुधवारी (27 फेब्रुवारी) विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचं विमान पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये पाकिस्तानी वायुसेनेने पाडलं आणि त्यांना अटक केली होती. त्यानंतर अभिनंदन यांच्या तथाकथित पत्नीचे व्हीडिओ सोशल मीडियावर पसरवले जात आहेत.
त्यापैकी एक व्हीडिओ हा "AajTak Cricket" या युट्यूब चॅनेलनं शेअर केला आहे. तसंच तो वेगवगेळ्या व्हॉट्सअॅप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपवरही पसरवण्यात आला आहे.
दुसरा व्हीडिओ तर काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिधू सहीत हजारो लोकांनी तो शेअर केले आहेत.
पहिल्या व्हीडोओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अभिनंदन यांच्या पत्नीशी फोनवर बोलले, असा दावा करण्यात आला आहे.
पण बीबीसीच्या पडताळणीत तो व्हीडिओ 2013चा निघाला. तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदी यांच्या अधिकृत वेबसाइटनं तो व्हीडिओ 2 नोव्हेंबर 2013 रोजी प्रसिद्ध केला होता. मोदींनी त्यावेळी असं ट्वीटही केलं आहे
2013मध्ये नरेंद्र मोदी यांनी पटनामध्ये रॅली घेतली होती. त्याठिकाणी झालेल्या बाँब ब्लास्टमध्ये मुन्ना श्रिवास्तव यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्या पत्नीशी मोदी यांनी फोनवरून विचारपूस केली होती.
व्हीडिओमध्ये मोदी झा यांच्या पत्नीला सांगतात, "तुम्हाला भेटायला मी तुमच्या घरी येणार होतो, पण खराब हवामानामुळं हेलिकॉप्टर खाली उतरवता आलं नाही. आमचे कार्यकर्ते तुम्हाला भेटायला येतील आणि आमचा पक्ष तुमच्या कुटुंबाची काळजी घेईल."
याआधी पुलवामा हल्ल्यानंतर हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पुलवामा हल्ल्यात मृत्यू पावलेल्या CRPF जवानाच्या पत्नीचं मोदी यांनी फोनवरून सांत्वन केलं, असं त्यावेळी पसरवण्यात आलं होतं.
दुसरा व्हीडिओ
दुसऱ्या व्हीडिओत एक स्त्री बोलताना दिसत आहे. ती विंग कमांडर अभिनंदन यांची पत्नी असल्याचा दावा व्हीडिओ पोस्ट करणाऱ्या लोकांनी केला आहे. "भाजपनं या परिस्थतीचं राजकारण करू नये, असं त्या म्हणत आहेत."
"सैन्य दलातल्या जवानांच्या सर्व कुटुंबांच्या वतीनं मी सगळ्यांना विनंती करते. राजकारण्यांनी जवानांच्या मृत्यूचं राजकारण करू नये. अभिनंदन यांचे कुटुंब सध्या किती तणावात आणि दु:खात असेल याचा विचार करा," असं ती स्त्री म्हणत आहे.
इंडियन युथ काँग्रेसचे ऑनलाईन मासिक 'युवा देश'नं हा व्हीडिओ ट्वीट केला आहे. त्यानंतर नवज्योत सिंह सिधू आणि समाजवादी पक्षाच्या एका आमदारानेही ते ट्वीट शेअर केलं आहे.
हा व्हीडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हजारो वेळा शेअर करण्यात आला आहे.
पण प्रत्यक्षात तो व्हीडिओ अभिनंदन यांच्या पत्नीचा नाहीये.
तसंच व्हीडिओमधली स्त्री स्वत: एका आर्मी ऑफिसरची पत्नी असल्याचं सांगत आहे. पण बारकाईनं तिला ऐकलं तर ती अभिनंदनच्या कुटुंबाला तिऱ्हाइत पणे उद्देशून बोलत आहे.
बीबीसीनं त्या व्हीडिओची पडताळणी केली. व्हीडिओमध्ये दिसणारी स्त्री ही अभिनंदन यांच्या पत्नीसारखी दिसत नाही. अभिनंदन यांच्या पत्नीचे फोटो याआधी मीडियात प्रसिद्ध झाले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)