पुलवामा CRPF हल्ला : सुरक्षेबाबतच्या हलगर्जीपणामुळे 34 जवानांचा जीव गेला? - बीबीसी मराठी राऊंडअप

बीबीसी मराठीच्या महत्त्वाच्या बातम्यांचा राऊंडअप

1. पुलवामा CRPF हल्ला : सुरक्षेबाबतच्या हलगर्जीपणामुळे 34 जवानांचा जीव गेला?

जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात CRPFच्या ताफ्यांवर झालेल्या हल्ल्यात किमान 34 जवानांनी जीव गमावला आहे. तर काही जवान जखमी झाले आहेत. हा हल्ला रोखता आला असता असं जम्मू आणि काश्मीरच्या गुप्तहेर खात्यातील अधिकाऱ्यांना वाटतं. जैश ए मोहंमद ही संघटना मोठा हल्ला करू शकते, अशी सूचना 12 फेब्रुवारीला देशातील सर्व सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली होती, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली आहे. ही सविस्तर बातमी इथं वाचा.

2. पुलवामा हल्ला : CRPF विषयी या 5 महत्त्वाच्या गोष्टी माहीत आहेत?

पुलवामा इथं जहालवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 34 जवानांनी जीव गमावला आहे. हे जवान CRPFचे होते. देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी असलेलं सर्वांत मोठी केंद्रीय सुरक्षा दल असलेल्या CRFP बद्दल जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा.

3. शरद पवार माढामधून निवडणूक लढवणार, पक्षाच्या बैठकीत निर्णय

शरद पवार माढामधून निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी शरद पवारांनी माढामधून लढावं अशी मागणी केली होती. त्यामुळे पक्षानं त्यांना तशी विनंती केली आहे. याची अधिकृत घोषणा मात्र अजून करण्यात आलेली नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिली आहे. सविस्त बातमी इथं वाचा.

4. Valentine's Day: 'गेले सांगायचे राहुनि' ही हुरहूर आता LGBT समुदायातून दूर होईल

'प्रेम कुणावरही करावं, असं कुसुमाग्रजांनी म्हटलेलं असलं, तरी भारतीय समाजाला हे मान्य नव्हतं. एलजीबीटी समुदायासाठी प्रेम करणं हा गुन्हा समजला जात होता. अगदी अलीकडेच ६ सप्टेंबर, २०१८ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७च्या जोखडातून या समुदायाची मुक्तता केली. यापुढे परस्पर संमतीने झालेल्या समलैंगिक संबंधांना गुन्हा मानण्यात येणार नाही, असा महत्त्वाचा निर्वाळा न्यायालयाने दिला. या पार्श्वभूमीवर या वर्षी येणारा 'व्हॅलेन्टाईन्स डे' महत्त्वाचा आहे. सर्वार्थाने प्रेमदिन म्हणून संबोधण्यासाठी.' सविस्तर लेख इथं वाचा.

5. राज ठाकरे आघाडीसोबत आले तर त्याचा फायदा कुणाला?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतल्यामुळे नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे. नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी राज ठाकरे यांनी महाआघाडीत यावं असं आवाहन अजित पवार यांनी भाषणात केलं होतं. बदलत्या राजकीय स्थितीचं विश्लेषण इथं वाचा.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)