You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एक लडकी को देखा तो ऐसा लगा या चित्रपटाची खरी हिरोईन...गझल
- Author, वंदना
- Role, टी. व्ही. एडिटर, भारतीय भाषा
ये हौसला कैसे झुके
ये आरजू कैसे रुके
मंज़िल मुश्किल तो क्या
धुंधला साहिल तो क्या
तन्हा ये दिल तो क्या...
2014मध्ये आमिर खानच्या सत्यमेव जयतेमध्ये आलेली ती तरुणी मला अजून लक्षात आहे. कुर्ता आणि चुडीदार असलेली आणि आत्मविश्वासाने पाहणाऱ्या गझल धालीवालनं आपल्या मधुर आवाजात हे गाणं म्हटलं होतं.
आणि मला प्रेक्षकांचे अचंबित झालेले चेहरे देखील लक्षात आहेत. जेव्हा गझलनं हे सांगितलं की तिचा जन्म हा मुलगा म्हणून झाला होता आणि ऑपरेशननंतर ती मुलगी बनली. गझलनं आपल्या लहानपणीचा एक फोटो देखील लोकांना दाखवला. त्या फोटोत तिने पगडी घातलेली दिसत होती.
याच गझल धालीवालने 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. हा चित्रपट लेस्बियन मुलींच्या प्रेमावर आधारित आहे. गझल एक ट्रान्सवूमन आहे. म्हणजे तिचा जन्म मुलगा म्हणून झाला पण ऑपरेशननंतर ती महिला झाली. तिचं आयुष्य हे संघर्षमय आहे.
आत्महत्या करण्याचा विचार
गझलचा जन्म पंजाबच्या पटियाला या शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिनं तिची कहाणी अनेक वेळा विविध ठिकाणी सांगितली आहे. 'सत्यमेव जयते'मध्ये ती सांगते, जेव्हा मी पाच वर्षांची होते तेव्हा मला मी मुलगीच समजत असे. पण खरं तर मी मुलगा होते. जसं वय वाढलं तशी माझ्यातील ही भावना दृढ होऊ लागली. मला मुलीसारखं नटायला आवडत होतं. मला वाटत होतं की मुलाच्या शरीरात अडकलेली मी एक मुलगी आहे.
डॉक्टर या स्थितीला जेंडर डिसफोरिया म्हणतात. म्हणजे की व्यक्तीचं लिंग एक असतं पण त्या व्यक्तीची जाणीव भिन्न असते. त्यामुळे ती व्यक्ती शारीरीक आणि मानसिक तणावात वावरते.
गझल सांगते की लहानपणी तिला असं वाटत असे की समाजाच्या चौकटीत बसत नाही. 12व्या वर्षी तिनं झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
गझलनं पहिल्यांदा आपल्या वडिलांना याबाबत सांगितलं. त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं नाही पण त्यांना वाटलं की ही अवस्था काही काळापुरतीच राहील. पटियाला सारख्या ठिकाणी हे सांगणं गजलसाठी खूप कठीण होतं की ती मुलगा आहे पण मुलीसारख्या भावना आहेत.
घर सोडून पळून गेली
गझलनं आपलं घर सोडून पळून गेली. पण पटियालाहून दिल्लीहून जाताना तिला परिणामांची भीती वाटली म्हणून घरी आली. त्याचवेळी तिच्या वडिलांच्या लक्षात आलं की तिची ही अवस्था काही काळापुरती नाही.
त्यानंतर गझलनं इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि इन्फोसिसमध्ये नोकरी करू लागली. पण मनात मुलगी बनायचे आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचे विचार घोळू लागले.
चित्रपट बनवावा असं वाटून तिनं मुंबई गाठली आणि या ठिकाणी येऊन तिनं ट्रान्सजेंडर लोकांवर चित्रपट बनवला. या चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान ती अनेक अशा लोकांना भेटली ज्यांनी आपलं लिंग परिवर्तन केलं होतं.
हा चित्रपट पूर्ण झाल्यावर गझलनं आपल्या आई-वडिलांना तो दाखवला. त्यांनी गझलला विचारलं की तू केव्हा आपलं लिंग बदलणार आहेस. तिनं ही गोष्ट सत्यमेव जयतेमध्ये सांगितली आहे.
जेव्हा तिनं लिंग परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिचे वडील भजन प्रताप सिंग आणि आई सुकर्णी धालीवाली यांनी ही नातेवाईक आणि शेजाऱ्यांना हे सांगायची जबाबदारी घेतली की ती आता मुलगा राहणार नाही मुलगी होणार आहे. तुमच्या आधाराची तिला गरज आहे. तिची नवी ओळख तिच्या नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी स्वीकारली.
2006 ला तिने सेक्स सर्जरीची प्रक्रिया सुरू केली. 2009मध्ये ती मुंबईला आली आणि एक नवं आयुष्य सुरू केलं. मग तिनं चित्रपटात काम शोधायला सुरुवात केली. तनुजा चंद्रा आणि अंलकृता श्रीवास्तव यासारख्या महिला दिग्दर्शकांबरोबर तिनं काम केलं.
2016मध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या वझीरसाठी संवाद लेखन केलं आहे. अंलकृता श्रीवास्तव यांच्या लिपस्टिक अंडर माय बुर्कासाठी त्यांनी संवादलेखन केलं आहे. 2017मध्ये करीब करीब सिंगल या चित्रपटाचा स्क्रीन प्ले तिनं लिहिला.
मला गझलनं 2015मध्ये इंक टॉकसाठी दिलेलं ते भाषण लख्ख आठवतं ज्यात ती म्हणते, "साधारणतः लोक हे चांगले असतात. पण काही वेळा त्यांच्या मनात भीती असते. त्यामुळे ते वाईट काम करतात. ही भीती नेमकी कशाची आहे हे त्यांना समजत नाही. ही भीती घालवायची असेल तर त्यांना हे सांगणं नवीन गोष्टी सांगणं आवश्यक आहे. ज्या लोकांबद्दल त्यांना माहीत नाही त्यांच्याबद्दल सांगणं आवश्यक आहे. एक बॉलीवूडची लेखिका म्हणून मी असं करू शकते पण हे करणं माझ्यासाठी सोप्पं आहे का? मी म्हणेन की नाही. जोपर्यंत माझ्या नावावर 100 कोटींचा चित्रपट नाही तोपर्यंत मी हे करतच राहील."
आणि काय आश्चर्य. गजलनं आपला मार्ग सोडला नाही. तिनं अशा विषयावर चित्रपट लिहिला आहे की ज्या विषयाची चर्चा समाजात होताना दिसत नाही. या चित्रपटाबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात पण या लेखिकेची कहानी मात्र हृदयस्पर्शी आहे.
(2011 जनगणनेनुसार भारतात 4.9 लाख ट्रांसजेंडर लोक आहेत. 66 टक्के लोक हे ग्रामीण भागात राहतात आणि त्यांच्या साक्षरतेचं प्रमाण 46 टक्के आहे.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)