काँग्रेसचं प्रियंकास्त्र..मोदी-शाह कसं परतवणार?

बीबीसी मराठीवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:

प्रियंका गांधी यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश

2019 लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसनं सगळ्यांत मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक लगावला आहे. काँग्रेसने प्रियंका गांधी यांना पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे.

राहुल गांधी सक्रिय राजकारणात आल्यानंतरही प्रियंका दररोजच्या घडामोडींपासून दूर होत्या. त्यांनी कायमच स्वत:ला राहुल यांचा मतदारसंघ असलेला अमेठी आणि सोनियांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीपुरतच मर्यादित ठेवलं होतं.

पण आता किमान उत्तर प्रदेशात तरी प्रियंका गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी आणि अमित शाह असा सामना निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. याविषयी संपूर्ण बातमी इथं वाचा.

प्रियंका गांधींना 'भय्याजी' का म्हणतात?

आतार्यंतचा प्रियकां गांधी यांचा जीवन प्रवास कसा राहिला? प्रियंका यांची हेअरस्टाईल, कपड्यांची निवड आणि बोलताना त्यांच्यात इंदिरा गांधीची छाप. तसंच अमेठी आणि रायबरेलीतली माणसं प्रियंका यांना राहुलप्रमाणं भय्या म्हणून हाक का मारायचे? उत्तर प्रदेशातल्या सामान्य जनतेला प्रियंका गांधी कोणत्या कारणांमुळं आवडतात? याविषयी आणखी वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

कन्हय्या कुमारनं इस्लाम धर्म स्वीकारला होता का?

आपण मुस्लीम असल्याचा स्वीकार JNU विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हय्या कुमारनं केल्याचा एक व्हीडिओ उजव्या विचारसरणीच्या फेसबुक पेजवर फिरत आहे. पण हे कितपत खरं आहे?

प्रत्यक्षात त्यांनी काय म्हटलं होतं? याबद्दल बीबीसी फॅक्ट चेक टीमनं सविस्तर बातमी केली आहे.

बाळासाहेब ठाकरेंचा 'सामना' जेव्हा ठाकरेंचा नव्हता, तेव्हाची गोष्ट..

शिवसेनेचं मुखपत्र असलेलं 'सामना' हे देशातलं एकमेव असं दैनिक आहे जे कायम बातम्यांमध्येही असतं. म्हणजे देशभरातील माध्यमंसुद्धा सामना काय छापतं यावर लक्ष ठेवून असतात. सामनात छापलेली बातमी किंवा अग्रलेख इतरांसाठी 'बातमी'चा विषय असतो.

पण सामनाची सुरुवात कशी झाली? बाळ ठाकरे यांच्याधी सामना कोण चालवत होतं? याविषयी इथं सविस्तर वाचा.

झिम्बाब्वे : इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाला हिंसक वळण

झिम्बाब्वेमध्ये इंधन दरवाढीविरोधात आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनासाठी सरकारने नियुक्त केलेल्या मानवी हक्क गटानं लष्कराकडून आंदोलकांवर अनन्वित अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निदर्शनं थांबवण्यासाठी लष्करातर्फे बळाचा वापर होत असल्याचा आरोप झिम्बाब्वे मानवी हक्क आयोगाने केला आहे.

वाचा झिम्बाब्वेहून बीबीसी प्रतिनिधी अँड्रू हार्डिंग यांचा खास रिपोर्ट

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)