You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
#10YearsChallenge : हे चॅलेंज नेमकं आहे तरी काय?
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. किकी चॅलेंज, मोदींचा फिटनेस चॅलेंज, डेली ऐली चॅलेंज, मोमो चॅलेंज अशा अनेक प्रकारच्या चॅलेंजेसनं २०१८ गाजवलं.
सध्या २०१९मधलं पहिलं चॅलेंज जोरदार ट्रेंडमध्ये आहे. या चॅलेंजचं नाव आहे #10YearsChallenge. अर्थात बॉलिवुड सेलिब्रिटीपासून ते सर्वसामान्यांपर्यंत या ट्रेंडची भुरळ पडली आहे.
नेमकं काय आहे हे चॅलेंज?
आता हे चॅलेंज नेमकं आहे तरी काय? हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुक्ता असेलचं. तर याचं उत्तर अगदी सोपं आहे.
या चॅलेंजमध्ये तुम्हाला स्वत:चा दहा वर्षांपूर्वीचा आणि आताचा फोटो हा हॅशटॅग वापरून शेअर करायचा आहे.
हॉलिवुडपासून बॉलिवुडपर्यंत बऱ्याच सेलिब्रिटींनी हे '10 Year Challenge' स्विकारलं आहे. डायना पेंटी, एकता कपूर, दिया मिर्झा यांनी स्वत:चे दहा वर्षांपूर्वीचे आणि आताचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सेलिब्रिटींनी स्वीकारलं चॅलेंज
सोनम कपूरने आपला 23व्या वर्षांतला 'दिल्ली ६' या चित्रपटातला आणि काही दिवसात प्रदर्शित होणाऱ्या 'एक लडकी को देखा तो...' या चित्रपटातले दोन फोटो शेअर करत विचारलंय की, तुम्हाला वाटतं मी माझ्या वडलांचा वारसा चालवतेय?
डायना पेंटीनेही आपला आताचा आणि १० वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत लिहिलंय, "काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. जसंकी ब्लॅक अँड व्हाईट फिल्टर. "
तर बिपाशा बासूनेही आपला २००८ आणि १८चा फोटो शेअर करत, "गेल्या १० वर्षांत आयुष्य अतिशय सुंदर आहे. त्यात तक्रार करण्यासारखं काहीच नाही," असं म्हटलं आहे.
तिने २००८मधला रेस आणि तिचा आगामी चित्रपट 'आदत'मधला फोटो शेअर केला आहे.
तर दिया मिर्झाने देखील हे चॅलेंज स्वीकारलं आहे.
गुल पनागने आपल्या तिशीतला फोटो शेअर करत. तेव्हा आणि आता... असं म्हटलं आहे.
दरम्यान, ESPNने शाहिद आफ्रिदीचा फोटो शेअर करत यांच्यातला फरक ओळखा असं म्हटलं आहे.
तर ATP टूर यांनी राफेल नडालचा २००७ आणि २०१७ मधला फोटो शेअर करत, आम्ही हे चॅलेंज योग्य रित्या करतोय ना? ;) असा मिश्किल प्रश्न विचाराला आहे.
आता सोशल मीडियावर एखादी गोष्ट ट्रेंड होतेय आणि त्याचे मीम्स शेअर होणार नाहीत असं झालं तरच नवलच, नाही का?
आता हे सगळं पाहाता, गेल्या १० वर्षांत तुमच्यात किंवा तुमच्या आयुष्यात काय बदल झाला याचा विचार करत बसू नका.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)