You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार : 'मोदींनी पंतप्रधानपदाला शोभेल असं वागावं, फक्त एकाच कुटुंबावरची टीका भोवली'
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या 78वा वाढदिवशी एक पत्रकार परिषद घेत, काल आलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निकालांवर आपली प्रतिक्रिया दिली.
त्यात त्यांनी मांडलेले 7 मुख्य मुद्दे -
1. साडेचार वर्षांचा केंद्र सरकारचा कारभार, त्यांचे निर्णय यावर लोकांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. नोटाबंदीसारख्या निर्णयात आर्थिक तज्ज्ञांचे मत घेण्यात आले नाही.
2. आर्थिक संस्थांवर हल्ला करण्यात आला, लोकांनी हे पण नाकारलं आहे.
3. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला राजीनामा द्यावा लागला, CBIमध्ये गोंधळाचा वातावरण, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना प्रथमच पत्रकार परिषद घ्यावी लागली, यामुळे लोकांमध्ये भाजपबद्दल शंका निर्माण झाली आहे.
4. मोदींनी या निवडणुकीत वैयक्तिक टीका केली. फक्त एकाच कुटुंबावर टीका केली, कारण त्यांच्याकडे कामांसंबंधी सांगण्यासारखं काही नव्हतं. याचा प्रतिकूल परिणाम भाजपवर झाला.
5. पंतप्रधानांनी त्यांच्या पदाची गरिमा राखायला हवी. त्यांनी प्रचारात अनेक धमक्या दिल्या, त्या त्यांच्या पदाला शोभत नाही.
6. समाजाच्या सगळ्या वर्गात मोदींबद्दल नापसंती दिसते.
7. बसपा आणि सपानं यूपीए सोबत यावं.
दरम्यान शरद पवार यांना आज राजकीय नेत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
"शरद पवार यांना दीर्घायुष्य लाभो, अशी मी प्रार्थना करतो," असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्वीट केलं आहे.
भाजप नेते एकनाथ खडसे यांनीही ट्वीट करत शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी फेसबुकच्या माध्यमातून पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)