You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रियंका चोप्राशी साखरपुड्यानंतर निक जोनस म्हणतो 'मी जगात सर्वांत भाग्यवान'
"Future Mrs. Jonas. My heart. My love" या शब्दांत निक जोनसने प्रियंका चोप्राबरोबरच्या आपल्या नात्यावर अखेर शिक्कामोर्तब केलं.
प्रियंकानेही "Taken.. With all my heart and soul.." असं म्हणत निकच्या प्रेमाला आपली स्वीकृती नोंदवली आणि आपण आता 'एंगेज्ड' असल्याचं जाहीर केलं.
प्रियंकाच्या या इन्स्टाग्राम फोटोवर निकने "Wow congrats. He's the luckiest guy in the world (व्वा! शुभेच्छा! तो जगातला सर्वांत भाग्यवान पुरुष आहे)" अशी कमेंट केली.
शनिवारी मुंबईत प्रियंकाच्या घरी पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर पार पडलेल्या एका छोटेखानी समारंभात साखरपुडा पार पडल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे. या कार्यक्रमासाठी दोघांचेही कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
प्रियंका आणि निक यांच्या प्रेमाची चर्चा मे महिन्यात सुरू झाली होती. तेव्हापासून अनेकदा ते एकत्र दिसले होते.
काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्रानं एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली होती. त्यात समुद्राकडे पाहत दोन व्यक्ती उभे होते. तो गोव्याचा फोटो होता. त्यात तिने लिहिलं होतं, 'माझे आवडते पुरुष'. या फोटोत एक जोनस होता आणि तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा होता.
काही दिवसांपूर्वी जोनसनेही इन्स्टाग्राम यांनी एक व्हीडिओ शेअर केला होता, त्यात प्रियंका नाचताना दिसतेय. त्यात लिहिलं होतं, 'तो'.
शिवाय निकनं मुंबईत येऊन प्रियंकाची आई मधू यांना भेटला, असं पीपल मॅगझिननं म्हटलं होतं.
तसंच काही आठवड्यांपूर्वी दिग्दर्शक अली अब्बास जाफरच्या एका ट्वीटमुळे ही बातमी जवळजवळ नक्की झाली होती.
प्रियंका आता 'भरत' चित्रपटाचा भाग असणार नाही. याचं कारण एकदम खास आहे. तिने आम्हाला काही दिवसांपूर्वीच याविषयी सांगितलं. हे कारण कळल्यावर आम्हाला आनंद झाला. प्रियकांला आयुष्यातील नव्या इनिंग्जसाठी खूप साऱ्या शुभेच्छा! असं दिग्दर्शक अली अब्बास झफर यांनी ट्वीट केलं आहे.
पण कोण आहे भविष्यातला मिस्टर प्रियंका चोप्रा?
खरंच, कोण हो हा निक जोनस? त्याचं गाव कुठलं? घरी दारी कोण? आणि प्रियंकाशी जवळीक कधीपासून सुरू झाली?
निक किंवा निकोलस जेरी जोनस एक अमेरिकन गायक, लेखक, अभिनेता आणि रेकॉर्ड प्रोड्युसर आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून त्याने अभिनय करायला सुरुवात केली.
निक यांचा जन्म अमेरिकेतील टेक्सास स्टेटमध्ये डॅल्लास येथे पॉल केविन जोनास सिनिअर यांच्या पोटी झाला. आपले भाऊ जो आणि केविन यांच्याबरोबर निकने 2005 साली एक बँड बनवला - द जोनस ब्रदर्स.
2006 साली त्यांचा पहिला अल्बम It's about time आला तेव्हा निक अवघ्या 13 वर्षांचा होता. या बँडला डिस्ने चॅनलवर मोठं यश मिळालं.
2014 साली हा बँड वेगळा झाला, त्यानंतर निकने सोलो अल्बम रिलीज केला. 2017मध्ये त्याचा I remember I told you या अल्बममध्ये अॅन मेरी होती.
त्यानंतर ते काही चित्रपटात दिसला. 2015 मध्ये Careful what you wish for चित्रपटात त्याला एक भूमिका मिळाली आणि 2019 मध्ये अपेक्षित असलेल्या सायफाय फिल्म Chaos Walking मध्ये डेवी प्रेटिंस ज्युनिअरची भूमिका निभावतील.
निकची संपत्ती 1.8 कोटी डॉलर इतकी आहे. त्यात जोनास ब्रदर्स बँड आणि त्यांच्या टीव्ही करिअरचा मोठा वाटा आहे.
जेव्हा निक 13 वर्षांचा होता, तेव्हा त्याला टाईप 1 डायबेटिस झाल्याचं कळलं. त्यानंतर त्याने 'चेंज फॉर चिल्ड्रन फाउंडेशन' तयार केलं. या आजाराबाबत जागृती निर्माण करण्याचं काम हे फाउंडेशन करत.
निकच्या आयुष्यात याआधीही अनेक नावं जोडली गेली आहेत. 2006-07 मध्ये त्याची गर्लफ्रेंड माईली सायरस होती. या अफेअरचा खुलासा माईली यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात केला होता. 2009 मध्ये ते पुन्हा जवळ आले पण नंतर त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)