You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातले जाणून घ्या हे 6 मुद्दे
मंजिल अपनी प्रत्यक्ष लिए हम तोड़ रहे हैं ज़ंजीरें
हम बदल रहे हैं तस्वीरें, ये नवयुग है ये नवभारत है
खुद लिखेंगे अपनी तकदीर, हम बदल रहे हैं अपनी तस्वीर
हम निकल पड़े हैं प्रण करके, अपना तन मन अर्पण करके
ज़िद है एक सूर्य उगाना है, अंबर से ऊंचा जाना है, एक भारत नया बनाना है. एक भारत नया बनाना है.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून झेंडावंदन केलं देशाला संबोधित करताना या कवितेनं भाषणाची सांगता केली. लाल किल्ल्यावरून पाचव्यांदा बोलताना त्यांनी देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला तसंच काही नवीन घोषणा केल्या.
जाणून घेऊ या त्यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे :
1. घोषणांची जंत्री
पंतप्रधान मोदींनी विविध योजनांची घोषणा करताना, वॉटर फॉर ऑल, LPG फॉर ऑल, टॉयलेट फॉर ऑल, स्किल फॉर ऑल, हेल्थ फॉर ऑल, इन्शुरन्स फॉर ऑल, कनेक्टिव्हिटी फॉर ऑल अशा अनेक घोषणा केल्या.
2. आयुष्यमान भारत योजना
जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालात स्वच्छता अभियानामुळे तीन लाख लोकांचा जीव वाचला. आता 25 सप्टेंबर 2018ला पंतप्रधान जन आरोग्य अभियान (आयुष्यमान भारत योजना) सुरू करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. या योजनेचा लाभ दहा कोटी कुटुंबांना मिळेल. प्रत्येक कुटुंबाला पाच लाखाचा विमा मिळेल.
3. महिलांना स्थायी कमिशन
सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डद्वारे (SSB) निवड होणाऱ्या प्रत्येक महिलेला पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही स्थायी कमिशनचा लाभ मिळणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली.
4. काश्मीरचा प्रश्न सामंजस्याने सोडवणार
काश्मीरमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचं मोदी म्हणाले. गोळीचं उत्तर गोळीनेच देणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
5. 2022पर्यंत अंतराळात भारतीय
आपला देश अंतराळ विज्ञान क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. 2022 पर्यंत अंतराळात हातात तिरंगा घेऊन आमची मुलं जातील असा आम्ही संकल्प केला आहे, असं मोदी म्हणाले.
6. काळा पैसा बाळगणाऱ्यांवर कारवाई
काळा पैसा, भ्रष्टाचार या गोष्टी कधीही सहन करणार नाही असं ते म्हणाले. कितीही अडचणी आल्या तरी या समस्येवर तोडगा काढूच असा निश्चय त्यांनी बोलून दाखवला. तीन लाख संदिग्ध कंपन्यांना टाळं लागलं आहे. पर्यावरणाच्या मंजूरीची प्रक्रिया पारदर्शी केली आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या सरकारच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला.
पंतप्रधान मोदींचे संपू्र्ण भाषण तुम्ही इथे पाहू शकता.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)