IPLमध्ये चेन्नईच जिंकणार हे बीबीसी मराठीच्या या वाचकांनी आधीच सांगितलं होतं

आज IPLचा शेवटचा सामना हैदराबाद सनरायझर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात रंगला. अत्यंत अटीतटीच्या या अंतिम सामन्यात हैदराबाद सनरायझर्सनं चेन्नई सुपरकिंग्स संघापुढे 179 धावांचं आव्हान उभं केलं. पण, हे आव्हान महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई संघानं लिलया पेलून आपला विजय साकार केला.

बीबीसी मराठीनं आपल्या वाचकांना हाच प्रश्न केला की, नेमका कोणता संघ जिंकेल. यात अनेकांनी चेन्नई सुपरकिंग्स जिंकेल अशी काहींनी अटकळ बांधली होती. तर, हैदराबाद सनरायझर्स विजयी होतील असाही दावा बऱ्याच जणांनी केला होता.

जो संघ जिंकेल त्यांचे अंदाज आणि प्रतिक्रिया आम्ही जाहीर करू असं यापूर्वीच जाहीर केलं होतं.

चेन्नईच्या बाजूनं प्रतिक्रिया दिलेल्या वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया आणि त्यांचे अंदाज पुढील प्रमाणे;

स्वप्निल चातरकर म्हणतात की, "चेन्नई सुपरकिंग्स संघाची बॅटींग ऑर्डर उत्तम आहे. सनरायझर्स हैदराबादनं उभ्या केलेल्या आव्हानाचा ते सहज पाठलाग करू शकतील."

तर, चेन्नई सुपरकिंग्सचं समर्थन करताना संजय वावले सांगतात, "रशीद खान या हैदराबादच्या स्पिनर बॉलरपुढे चेन्नईचा आरामात निभाव लागेल. सामना फिरवण्याची ताकद त्यांच्यात आहे."

सागर आव्हाड सांगतात, "चेन्नईचे खेळाडू उत्तम खेळत असून त्यांनी आतापर्यंत विजयी खेळीच केली आहे. त्यामुळे यावेळी चेन्नईचा विजय निश्चित असेल."

चेन्नईची बाजू घेताना डॉ. विशाल पाटील सांगतात, "वानखेडे स्टेडियमवर कमी धावांच्या मॅचेस होतात. या मोसमात चेन्नईनं हैदराबादला 3 वेळा नमवलं आहे. आज धोनीचा अनुभव सुद्धा कामी येईल."

चेन्नई जिंकण्यासाठी धोणीच कारणीभूत ठरेल हे सांगताना विजय भुरे म्हणतात, "धोणी किंग असल्यानं चेन्नई सुपर किंग ठरणारंच."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)