You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल : 'ऑस्ट्रेलियाकडे खिलाडूवृत्ती नाहीच'
केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिका विरूद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना सुरू असताना ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बाह्य साधनाद्वारे चेंडू कुरतडला (बॉल टँपरिंग).
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चूक मान्य केली. अल्पावधीतच ही चूक कोण्या एकाची नसून हा चीटिंगचा शिस्तबद्ध कट असल्याचं समोर आलं आणि क्रिकेटच खोल गर्तेत गेलं.
त्यामुळे स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या खेळाडूंवर वर्षभराची बंदी घालण्यात आली.
या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांना प्रश्न विचारला होता की, या खेळाडूंना देण्यात आलेली शिक्षा तुम्हाला रास्त वाटते की अवाजवी? वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. बहुतांश वाचकांना ही शिक्षा रास्त वाटली.
"स्मिथ खूप चांगला फलंदाज आहे, पण या सभ्य माणसांच्या खेळात त्यांनं वारंवार चूका केल्या आहेत," असं लिहिलं आहे तुषार राऊत यांनी.
"भारताच्या दौऱ्यावर असताना DRSसाठी मैदानाबाहेरची मदत घेणं आणि आता हे, त्यामूळे त्याला शिक्षा व्हायलाच हवी होती. मला स्वतःला शिक्षा थोडी जास्त वाटते, पण त्यामूळे आपल्या आँस्ट्रेलिया दौऱ्याची चुरस आणि मजा कमी होणार हे नक्की," असंही ते पुढे म्हणतात.
"अशा चुकांना जर अभय दिलं तर क्रिकेट धर्म मानणाऱ्या आपल्या आणि इतर देशांमध्ये खेळाविषयीची विश्वासार्हता लोप पावेल," असं मत व्यक्त केलं आहे नितीन भालेराव यांनी.
ऑस्ट्रेलियाकडे खिलाडूवृत्ती नाहीच असं दिपक चौगुले यांना वाटतं. "मात्र अशा प्रकरणाकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल गांभीर्यानं न बघता कानेाडोळा करतं. त्यामुळे क्रिकेटमधील अक्षम्य चुकांसाठी कायमस्वरूपी बंदी हा निर्णय लागू केला तर क्रिकेटमधील अशा अखिलाडू वृत्तींना आपोआपच पायबंद बसेल," असं त्यांना वाटतं.
तर "अजून शिक्षा व्हायला हवी होती," असं लिहिलं आहे घनश्याम प्रभावळे यांनी.
दुसरीकडे सतिश गव्हाणे यांना मात्र स्मिथ आणि वॉर्नर यांना लोकांनी माफ करावं असं वाटतं. त्यांनी गुन्हा कबुल करून माफी मागितली आहे, त्यामुळे त्यांना माफ करावं असं ते लिहितात.
रफिक मनयार यांनी मात्र शंका उपस्थित करत, "याआधी त्यांनी किती वेळा असं केलं असेल," हा प्रश्न उपस्थित केला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)