एल्फिन्स्टन रोड चेंगराचेंगरी : मुंबईच्या गर्दीचे हकनाक बळी ठरलेले हे चेहरे
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी
मुंबईत एल्फिन्स्टन रोड स्टेशनच्या पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा बळी गेला.
बरोबर एका महिन्यापूर्वी, 29 सप्टेंबर 2017 रोजी मुंबईतल्या गर्दीच्या या रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलावर अभूतपूर्व चेंगराचेंगरी झाली. यात 23 जण मृत्युमुखी पडले आणि 30 पेक्षा जास्त जखमी झाले.
सकाळच्या गर्दीच्या वेळी नेमका पाऊस सुरू झाला आणि पुलावरची गर्दी वाढत गेली. एल्फिन्स्टन रोडच्या पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे मार्गांना जोडणाऱ्या पुलावर ही दुर्घटना घडली.
बेसुमार गर्दी आणि त्यातच पडलेल्या पावसामुळे आडोशाची जागा शोधण्यासाठी लोकांची झालेली धावपळ चेंगराचेंगरीला कारणीभूत ठरली.
या दुर्घटनेत दगावलेल्या 23 पैकी 13 जणांची ही माहिती (प्रत्येकाच्या माहितीसाठी फोटोवर क्लिक करा. )
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)





