ढेकणांशी लढता लढता दक्षिण कोरियातील अधिकाऱ्यांच्या आले नाकी नऊ

फोटो स्रोत, Getty Images
- Author, केल्ली एनजी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
दक्षिण कोरियामध्ये ढेकणांचा उच्छाद वाढला आहे. त्यामुळे देशभरात चिंतेचं वातावरण आहे. इथले शासकीय अधिकारी ढेकणांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी काम करत आहेत.
स्थानिक माध्यमांच्या बातमीनुसार 5 नोव्हेंबरपर्यंत राजधानी सोल सह बुसान आणि इंचॉन शहरांमध्ये ढेकणांचे किमान 17 उद्रेक झाल्याची नोंद झाली आहे.
ढेकणांचा उच्छाद लक्षात घेता सोल प्रशासनानं 500 मिलियन वॉन ((3 कोटी 17 लाख 15 हजार 873 रुपये) इतका निधी बाजूला काढून ठेवला आहे आणि ढेकणांचा सामना करण्यासाठी एका कृती दलाची स्थापन केली आहे.
या आधी फ्रान्स आणि ब्रिटनमध्येही ढेकणांची दहशत पसरली होती.
दक्षिण कोरियामध्ये सर्वप्रथम डाएगू शहरातील विद्यापीठात सप्टेंबर मध्ये ढेकणांचा प्रादूर्भाव दिसून आला. नंतर पर्यटक निवास आणि सार्वजनिक स्नानगृहात ढेकणं दिसून आली.
दक्षिण कोरियात ढेकणांची इतकी भीती आहे की लोक सिनेमा हॉल आणि सार्वजनिक वाहतुकीपासून दूर राहताहेत.
दक्षिण कोरियाच्या डेली न्यूजने वृत्त दिलं आहे की सोलच्या रहिवासी 34 वर्षीय चोई या सध्या फॅब्रिक सीट असलेल्या सबवे ट्रेनमध्ये प्रवास करणं टाळत आहेत.
या वृत्तात म्हटलं आहे की, ढेकूण अचानक दिसतील या भीतीने चोई आपल्या घरात सर्वत्र कीटकनाशकं फवारत होत्या.
ढेकणांचा प्रादूर्भाव पाहता आणखी एक स्थानिक रहिवाशी सीओ आणि त्यांच्या मैत्रिणीनं घरीच राहण पसंत केलं.
दक्षिण कोरियाने 1960 च्या दशकात देशव्यापी मोहिमेअतंर्गत ढेकणांचं निर्मुलन केलं होतं. आता पुन्हा त्यांचा उद्रेक झाला आहे.
ढेकूण रोग पसरवत नाहीत, पण ढेकूण चावल्यामुळे खूप खाज सुटते.

फोटो स्रोत, SPL
त्या जागी खाजवल्यास जखम होऊ शकते आणि मग संसर्गाचा धोका असतो. तसंच त्या जागी व्रण किंवा डाग येऊ शकतो.
पंख नसलेला हा ढेकूण कीटक बहुतेक वेळा पलंग किंवा पलंगाजवळच्या फटीत असतो, ढेकणांच्या उच्छादामुळे अस्वस्थ वाटू लागतं आणि झोपण्याची भीती वाटते.
ढेकणांच्या देशव्यापी उच्छादानंतर सोल शहरातील लोक सार्वजनिक आरोग्य केंद्रांकडे जात आहेत आणि कीटक चावल्याची तपासणी करुन घेत आहेत.
त्यावर काय उपाय केले पाहिजेत याबद्दल सल्ला मागत आहेत, असं स्थानिक वृत्तात म्हटलं आहे.
सोल मेट्रोपॉलिटन प्रशासन शहरातील त्यांचं स्वच्छताविषयक मूल्यांकन करण्यासाठी हॉटेल आणि बाथहाऊससह सुमारे 3,200 सार्वजनिक सुविधांची तपासणी करणार आहे.
ढेकूण नियंत्रित करण्याच्या सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा करण्यासाठी सरकार खाजगी तज्ज्ञांना सल्ला घेईल
ढेकणांवर उपाय म्हणून सोल शहरात भुयारी मार्गांवर हॉट-स्टीम फॅब्रिक सीट्स ही योजना आखत आहे आणि फॅब्रिक कवरिंग बदलण्याची योजना असल्याचं स्थानिक वृत्तात म्हटलं आहे.
ढेकूण मारण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर करण्याच्या अधिकार्यांच्या अलीकडील शिफारशींमुळे वाद निर्माण झाला आहे.
कारण अभ्यासकांच्या मते ते कुचकामी आहे, असं वृत्त दक्षिण कोरियाचं राष्ट्रीय दैनिक जोंगआंग डेलीने दिलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बी'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








