You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
द नाईट वॉच : साडेतीनशे वर्षं गूढ राहिलेलं चित्र, ज्यामधे दडली होती हत्येच्या कटाची गोष्ट
जगप्रसिद्ध चित्रकार रेम्ब्रेंट वॉन रिन यांचं 1669 मध्ये वयाच्या 63 वर्षी निधन झालं. त्यावेळी त्यांचा मृतदेह एका प्लॉटमध्ये दफन करण्यात आला. त्याकाळी गरिबांच्या निधनानंतर 20 वर्षांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढून फेकला जात असे.
रेम्ब्रेंट यांच्याबाबतही असंच झालं. मात्र, 1909 च्या अखेरीस वेस्टरकर्क म्हणजे अॅमस्टरडॅमच्या डच रिफॉर्म्ड चर्चच्या उत्तरेकडील भिंतीत त्यांच्या नावाचं स्मारक बसवण्यात आलं.
इथेच रेम्ब्रेंट यांना दफन करण्यात आलं होतं. हे स्मारक आजही तिथे आहे.
खासगी आयुष्यात रेम्ब्रेंट त्यांची पत्नी सास्कियापासून जन्मलेल्या सर्व मुलांपेक्षा जास्त जगले.
अॅमस्टरडॅमच्या एका कंपनीसाठी त्यांनी रेखाटलेलं ‘द नाईट वॉच’ चित्र ज्या वर्षी पूर्ण केलं, त्याच वर्षी पत्नी सास्कियाचं निधन झालं.
रेम्ब्रेंट यांच्या सर्व मुलांमधील टीटसच केवळ वयोवृद्ध होईपर्यंत जगू शकली. मात्र, रेम्ब्रेंटच्या आधीच तिचाही मृत्यू झाला. टीटसचा मृत्यू प्लेगने झाला.
आयुष्याच्या शेवटच्या काळात रेम्ब्रेंट आर्थिक अडचणींचा सामना करत होते. त्याच काळात टीटसचा मृत्यू झाल्यानं त्यांना मोठा धक्का होता.
आता जे रेम्ब्रेंट हाऊस म्युझियम आहे, ते रेम्ब्रेंट यांचं घर होतं. 1656 साली आर्थिक अडचणींमुळे त्यांना ते घर विकावं लागलं होतं. त्यावेळी टीटस आणि हेन्ड्रीक यांनी त्यांना आर्थिक मदत केली होती.
हेन्ड्रीक यांना रेम्ब्रेंट यांनी नोकरी देऊन घरी ठेवलं होतं. त्याच वर्षी त्यांना त्यांच्या कलाकृतींचाही लिलाव करावा लागला होता.
कट आणि संकेत
अनेक वर्षे रेम्ब्रेंट यांच्या या अवस्थेला त्यांची कलाकृती ‘द नाईट वॉच’शी जोडून पाहिलं गेलं.
सिनेदिग्दर्शक पीटर ग्रीनअवे यांच्यामुळे रेम्ब्रेंट यांच्या कलाकृतीने अनेक कट-कारस्थानांच्या कहाण्यांनाही जन्म दिला. 2007 मध्ये आलेल्या ग्रीनअवे यांच्या ‘नाईट वॉचिंग’ या सिनेमाने आणि त्यानंतर आलेल्या ‘रेम्ब्रेंट्स जेक्यूज’ माहितीपटात असं मांडण्यात आलं की, कलाकृतीतूनच एका हत्येच्या कटाचा पर्दाफाश करण्यात आलाय. यावरून असं वाटतं की, रेम्ब्रेंट यांच्या जीवाला कसलातरी धोका होता, ज्यानंतर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.
1936 साली अलेक्झेंडर कोरदाच्या ‘रेम्ब्रेंट’ या सिनेमातही चित्रामध्ये असंच काहीसं दाखवलंय. आनंदोत्सवात जेव्हा ‘नाईट वॉच’वरून पडदा हटवला जातो, तेव्हा नागरी सैन्याचे सदस्य आणि त्यांच्या पत्नी यांच्या शांततेची जागा त्यांच्या पत्नींच्या हास्यानं घेतली. यानंतर सैन्याच्या संतापात वाढ झाली.
चार्ल्स लॉटन यांच्या ‘रेम्ब्रेंट’ सिनेमात रेम्ब्रेंट जेव्हा त्याचा मित्र जीन सिक्स याला चित्राबद्दल प्रामाणिकपणे प्रतिक्रिया विचारतो, तेव्हा तो मित्र म्हणतो की, मला या चित्रात सावल्या, काळोख आणि भ्रमाशिवाय काहीच दिसत नाहीय.
विशेष म्हणजे, जीन सिक्स सुद्धा रेम्ब्रेंट यांच्या महान चित्राचा विषय होते. काही क्षणानंतर कॅप्टन बॅनिंग कॉक, ज्यांना या चित्रात दाखवलंय, त्यांनीही या चित्राला ‘अत्यंत वाईट’ असल्याचं म्हटलं होतं.
मात्र, असंही वाटतं की, बॅनिंग कॉकनेच गेरिट लुन्डेंस नावाच्या डच चित्रकाराला या चित्राचा एक छोटं प्रारूप तयार करायला सांगितलं होतं. ते छोटं प्रारूप आता लंडनच्या नॅशनल गॅलरीत आहे.
रेम्ब्रेंटच्या कलाकृतीचं हे प्रारूप मूळ चित्राच्या अगदी काही वर्षातच बनवण्यात आलं होतं. लुन्डेंसच्या चित्रामुळे आपल्याला लक्षात येतं की, रेम्ब्रेंटची कलाकृती कशी दिसत होती.
1715 साली रेम्ब्रेंटच्या चित्राच्या वरील आणि डावीकडील बाजूनं दोन-दोन फूट, तसंच खालील आणि उजवीकडील बाजूने काही इंच कापण्यात आलं होतं. यामुळे चित्राचं मूळ रूप बिघडलं होतं. परिणामी काठावर असलेल्या बॅनिंग कॉक आणि त्याचा सहकारी आता चित्राच्या मध्यभागी आला होता. यामुळे चित्रातली मूळ भावना निघून गेली.
आजच्या काळात असं करणं गुन्हा ठरला असता. मात्र, तेव्हा असं होत असे. या चित्राबाबतची छेडछाड तेव्हा झाली, जेव्हा नागरी सैन्य कंपनीच्या हॉलमधून अॅम्स्टरडॅम सिटी हॉलमध्ये हे चित्र लावण्यात आळं होतं.
1885 साली या चित्राची नवी जागा रिज्स्क म्युझियममध्ये तयार झाली. या म्युझियममध्ये या चित्रासाठी खास गॅलरी बनवण्यात आली.
एक खोटी कथा...
‘नाईट वॉच’मुळेच रेम्ब्रेंटचा शेवट झाला? कदाचित आपल्याला चित्रकलेतील हत्येच्या कटाच्या संकेतांकडे पाहण्याऐवजी डच प्रजासत्ताकात लोकप्रिय असलेल्या चित्रकलेच्या उपशैलीचे नियम पहावे लागतील, ज्यामुळे रेम्ब्रेंट विचलित झाले होते.
हे नियम सिव्हिक मिलिशिया पोर्ट्रेट किंवा गार्डरूम दृश्यांमध्ये दिसतात. यावरून याचा अंदाज लावला लावता येतो की, रेम्ब्रेंटच्या प्रसिद्ध चित्रामुळे ते लोक नाराज झाले होते, ज्यांनी हे चित्र बनवलं होतं.
रेम्ब्रेंटच्या सर्व कलाकृतींच्या तुलनेत ही कलाकृती सर्वश्रेष्ठ होती. छेडछाडीनंतरही 12 फूट बाय 14 फूटांची ही कलाकृती आहे. कलाकृतीत एकप्रकारचा गुंता असला, तरी चित्रात ते दिसत नाही, उलट रिक्तपणा आणि विचित्रपणा दिसतो.
यात एक कुत्रा भुंकत आहे. ढोलकी वाजवणारा ढोल वाजवत आहे. डावीकडे एक मुलगा पळत आहे आणि बिगुल घेऊन मागे वळून पाहत आहे. एक गार्ड त्याच्या बंदुकीच्या नळीशी काहीतरी खटपट करतोय. नीटनेटकेपणाने तयार असलेल्या कॅप्टनच्या मागे दुसर्या गार्डची बंदूक चुकून गोळीबार करते, त्याच्या लेफ्टनंटच्या परिधान केलेल्या टॉप हॅटमधून धूर निघतो आणि एक विचित्र दृश्य निर्माण करतो. उजवीकडे एक रक्षक त्याच्या बंदुकीच्या बॅरलकडे लक्षपूर्वक पाहत आहे. दुसरीकडे, चित्रातील काही लोक मुख्य पात्रांच्या मागे ढकलाढकलीत व्यग्र आहेत आणि ते फारसे दिसत नाहीत.
बॅनिंग कॉकच्या डावीकडे वरील बाजूस दिसणारा डोळा स्वत: चित्रकाराचा आहे. जसं की, बेल्जियमचा चित्रकार वॉन आइकला आवडत असे, रेम्ब्रेंट सुद्धा संपूर्ण दृश्यात कुठे ना कुठे त्याची स्वत:ची छाप सोडायचा.
चमकदार रंगाच्या सोनेरी कपड्यांमध्ये आणि कमरेभोवती मृत कोंबडी लटकलेली चित्रात दिसणारी मुलगी या चित्राचा एक भाग आहे असे वाटते आणि भाग नाही असंही वाटतं. खरंतर एखाद्या खऱ्याखुऱ्या व्यक्तीपेक्षा ती एखाद्या खूण किंवा संकेतासारखी दिसते. कोंबडी किंवा त्याऐवजी तिचे स्पष्टपणे दिसणारे पंजे हे क्लोव्हेनियर्स (किंवा मस्केटियर्स) नावाच्या बॅनिंग कॉकच्या कंपनीचे प्रतीक आहेत.
आता प्रश्न उपस्थित होतो की, नागरी सेनेचे प्रतीक म्हणून कोंबडीऐवजी ससाणा का दाखवला गेला नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. कदाचित रेम्ब्रेंट कॅप्टनच्या नावाची किंवा त्याच्या आहाराची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करत असेल. गमतीची गोष्ट म्हणजे त्या प्रतिकाचा चेहरा रेम्ब्रेंटच्या सास्कियासारखा आहे.
आता आपण या चित्रातील त्या गार्डकडे लक्ष देऊ, ज्याच्या बंदुकीतून गोळी सुटली आणि त्या गोळीने लेफ्टनंटचे डोके जवळजवळ उडवलेच होते. त्याचा चेहरा आपल्याला दिसत नाही. कंपनीत असूनही तो कंपनीचा भाग असल्याचे दिसत नाही. कदाचित तो कंपनीचा इतिहासही दाखवत असेल.
जरी कॅप्टन आणि त्याचा लेफ्टनंटला कंपनीच्या प्रमुखासारखं स्पष्टपणे दाखवलं असलं, तरी गार्डचे पोशाख समकालीन दृष्टीने अगदी साधे दिसतात. रेम्ब्रेंटने त्याचे चित्र पूर्ण केले तोपर्यंत, बॅनिंग कॉक आणि त्याच्या माणसांची उपयुक्तता खूपच कमी झाली होती. कारण स्पेनमध्ये शांतता प्रस्थापित झाली होती.
मात्र, रेम्ब्रेंटची काळजी केवळ नागरी अभिमानापुरती मर्यादित नव्हती. एकाच वेळी गांभीर्य आणि विनोद या दोन्ही गोष्टी असलेल्या कॅनव्हासवर त्यांना एक नाटक तयार करायचं होतं. यासाठी कॅप्टनचे गांभीर्य आणि बाकीच्या लोकांचं हस्या आपल्याला चित्रात दिसतं. याआधी नागरी सेनेचे असे चित्र कोणीही काढले नव्हते.
रेम्ब्रेंटच्या अडचणींमध्ये त्या शतकाच्या उत्तरार्धात दोन गोष्टींमुळे खतपाणी मिळालं. पहिली गोष्ट म्हणजे, तो मोठ्या प्रमाणावर खर्चा करायचा आणि दुसरं म्हणजे रंगांशी त्याचं नातं फारसं गंभीर नव्हतं. त्याची शैली फॅशनच्या बाहेर जाणारी होती.
याच काळात रेम्ब्रेंटचा माजी शिष्य गॅरिट डू यांची चित्र लोकांना अधिक आवडू लागली होती. त्यामुले रेम्ब्रेंटला इम्प्रेशनिस्ट्स म्हणजे संस्कारवाद्यांच्या उदयापर्यंत वाट पाहावी लागली. त्यानंतर पुन्हा रेम्ब्रेंटचं नाव पुढे आलं.
‘द नाईट वॉच’ या चित्राला खरंतर हे नाव 1790 च्या दशकात देण्यात आलं. यावेळी हे चित्र गडद आणि काहीसे काळपट झाले होते, ज्यामुळे त्यावर काळाखोच्या छटा दिसू लागल्या होत्या.
याआधी हे चित्र कॅप्टन फ्रॅन्स बॅनिंग कॉक यांच्या नेतृत्वाखाली द मिलिशिया कंपनी ऑफ डिस्ट्रिक्ट II, किंवा फ्रॅन्स बॅनिंग कॉक आणि विलेम वॉन रिटेनबर्चची शूटिंग कंपनी यासारख्या अधिक विचित्र नावांनी ओळखले जात असे.
1946 मध्ये चित्र स्वच्छ केल्यानंतरही चित्राचं रहस्य मात्र पूर्वीसारखंच आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)