You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लिओनार्डो दा विंची यांचे समलैंगिक संबंध? काय खरं काय खोटं?
लिओनार्डो दा विंची यांचा आज स्मृतिदिन आहे. लिओनार्डो दा विंची हे युरोपातील प्रसिद्ध चित्रकार आणि तत्वज्ञानी होते. त्यांना मोनालिसा, द लास्ट सपर आणि व्हिट्रुव्हियन मॅन या त्यांच्या जगप्रसिद्ध पेंटिंगसाठी प्रामुख्यानं ओळखलं जातं.
पण कला आणि तत्वज्ञान क्षेत्रातही त्यांची भरीव कामगिरी राहिलेली आहे.
त्यांच्या कलाकृती आणि ख्रिस्ती धर्मातील काही वादग्रस्त कल्पनांवर आधारित 'दा विंची कोड' या कादंबरीनंही लिओनार्डो दा विंची हे नाव सामान्यांपर्यंत पोहोचलं. ही कादंबरी डॅन ब्राऊन यांनी लिहिली होती.
मात्र, लिओनार्डो दा विंची या नावाशी संबंधित इतरही काही वाद समोर आलेले आहेत.
9 एप्रिल 1476 मध्ये लिओनार्डो दा विंची यांचे एका पुरुषाशी शारीरिक संबंध असल्याची तक्रार इटालियन फ्रंटच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यावेळी लिओनार्डो हे अवघ्या 23 वर्षांचे होते.
एका पुरुषासोबत संबंध?
17 वर्षीय जॅकब साल्टरेली याच्याशी अनेक जणांचे शारीरिक संबंध असल्याच्या चर्चा होत्या. पण त्यापैकी केवळ 4 जणांची नावं समोर आली होती. त्यापैकी एक नाव होतं, लिओनार्डो दा विंची.
इतर तिघांमध्ये बार्थोलोमी डी पास्किनो नावाचा सोनार, पॅक्सिनो नावाचा टेलर आणि तिसरा लिओनार्डो तोर्णा बुआणी हा होता. तिसरा व्यक्ती फ्लॉरंटाईन कुटुंबाशी संबंधित होता. मेडिसी शासकांशी त्यांचे संबंध होते.
मात्र, त्यांची तक्रार कोणी केली त्याचं नाव मात्र समोर आलं नव्हतं.
इटलीच्या फ्लॉरन्समध्ये अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवणं बेकायदेशीर असलं, तरी पुरुषाने पुरुषाबरोबर शारीरिक संबंध ठेवणं हे अगदी सर्वसामान्य होतं. अनेक पुरुष या चुका करायचे आणि त्यांना न्यायाधीशांसमोर उभं करावं लागायचं, असं इतिहासकार मायकल रॉकी यांनी 'फॉरबिडन फ्रेंडशिप्स' या पुस्तकात लिहिलं आहे.
आजच्या काळात हा आकडा काहीसा आश्चर्यकारक वाटू शकतो, मात्र त्यावरून ऐतिहासिक काळात लैंगिक संबंधांची स्थिती एकूण कशी होती याचं प्रतिबिंब नक्की उमटतं.
आरोप झालेल्यांपैकी केवळ 20 टक्के दोषी ठरले. त्यानंतरही दंड पूर्णपणे वसूल होऊ शकला नाही. अनैसर्गिक संबंधांना धार्मिक दृष्टीनंही मान्यता मिळालेली नव्हती.
अशा प्रकारे पुरुषांबरोबर संबंध असलेले दोन सर्वात प्रसिद्ध लोक होते. एक म्हणजे मायकलअँजेलो. पुनर्निर्मितीच्या कालखंडातील तेही एक प्रसिद्ध कलाकार होते. प्रसिद्ध डेव्हीड शिल्पाचे ते शिल्पकार होते. तर दुसरे म्हणजे प्रसिद्ध राजकीय विचारवंत मकियावेल्ली.
मायकलअँजेलो यांनी टोमाझो कॅवॅलिरी यांच्यासाठी प्रेमकविता रचल्या होत्या. तर मकियावेल्ली यांचे रिकिओ नावाच्या पुरुष सेक्स वर्करबरोबर संबंध होते.
मात्र, लिओनार्डो दा विंची आणि सलाई यांच्या नात्यानं अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या. दा विंचीच्या चित्रांमध्येही त्याची झलक पाहायला मिळते.
लिओनार्डो दा विंची यांची लैंगिक ओळख?
1476 मध्ये प्रकाशित केवळ एका कागदपत्रावरून लिओनार्डो दा विंचीच्या लैंगिक इच्छेबाबत माहिती मिळते. हा आरोपही शक्यतांवर किंवा अफवांवर आधारित असू शकतो, किंवा त्यांना शिक्षा व्हावी म्हणून तो, पसरवलेला असू शकतो.
लिओनार्डो यांचे पुरुषाशी संबंध होते अथवा ते अविवाहित होते, हे तथ्य इतिहासकार मान्य करत नाहीत.
हे सर्व काही एकाचवेळी घडलेले असू शकत नाही. काही काळ ते ब्रह्मचारी राहिले असतील आणि कदाचित नंतर त्यांना शारीरिक संबंधात रस निर्माण झाला असेल.
किंवा त्यांच्यामध्ये लैंगिक सुखाबाबत इच्छाच नसेल, अशीही शक्यता आहे.
लिओनार्डो यांचे एखाद्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याचेही पुरावे नाहीत. पण तरीही त्यांचे तसे संबंध असल्याचे आरोप करणाऱ्यांना ते रोखूही शकले नाहीत.
लैंगिक निवडीबाबत आता ज्या पद्धतीचा दृष्टीकोण आहे, तसा मध्य युगाच्या अखेरिस आणि आधुनिक युगाच्या सुरुवातीला नव्हता.
लिओनार्डो आणि सलाई
लिओनार्डो आणि जियांको गियाकोमो कॅप्रोत्ती यांच्यात असलेल्या संबंधांची सर्वाधिक चर्चा झालेली आहे. सलाई म्हणजे छोटंसं भूत. 1940 मध्ये सलाई लिओनार्डो यांच्या घरी त्यांचे सहकारी (असिस्टंट) म्हणून राहू लागले. त्यावेळी ते केवळ 10 वर्षांचे होते. तेही चित्रकार बनले.
लिओनार्डो त्यांच्यापेक्षा 28 वर्षांनी मोठे होते. लिओनार्डो सलाईला कदाचित चोर म्हणत असतील. पण सलाई अखेरच्या क्षणापर्यंत लिओनार्डो यांच्या घरी होते.
लिओनार्डोने त्यांना जमीनही भेट म्हणून दिली होती.
सुंदर दिसणारा आणि कुरळे केस असलेला सलाई हा दा विंचीचा आवडता तरुण होता, असं जॉर्जिओ वसारी यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.
लिओनार्डो यांच्या अनेक चित्रांसाठी सलाई यांनी मॉडेल म्हणून काम केलं होतं. लिओनार्डो आणि सलाई या दोघांचे एकमेकांबरोबर संबंध असल्याचा आरोप 16 व्या शतकातील चित्रकार गियान पालो लोमाझो यांनी केला होता. लोमाझो यांनी दा विंची आणि सलाई या दोघांनाही पाहिल्याची शक्यता कमी होती. पण त्या दोघांना ओळखणाऱ्यांशी ते बोलले होते.
याबाबत आज असलेला सर्वात मोठा वाद म्हणजे एक 43 वर्षीय व्यक्ती आणि त्यांचा 15 वर्षीय सहकारी यांचे एकमेकांबरोबर शरीरसंबंध होते.
इतिहासकार रॅचेल होप क्लिप्स यांनी ब्रिटीश लेखक नॉर्मम डगलस यांच्याबाबत केलेल्या अभ्यासावरून लक्षात येतं की, फ्लॉरन्समधील लोक हे प्राचीन परंपरेनुसार जगत होते. 20 व्या शतकापर्यंत युरोपामध्ये दोन पुरुषांमधील शारीरिक संबंध हे स्वीकारण्यात आलेले होते.
लिओनार्डो दा विंची यांच्या लैंगिक नात्याच्या स्थितीबाबत सत्य समोर येण्याची काहीही शक्यता नाही. आपण केवळ ऐतिहासिक माहितीच्या आधारे काही अंदाज बांधू शकतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)