You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फ्रान्समध्ये सापडलं मोनालिसाचं 'न्यूड स्केच'!
फ्रान्सच्या कला क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते एका संग्रहालयात सापडलेलं तब्बल 150 वर्षं जूनं चित्र मोनालिसाचं असू शकतं. कोळशापासून ते चितारण्यात आलं आहे.
कोळशापासून काढलेल्या या चित्रात एक विवस्त्र महिला आहे. तिचं नाव मोना वाना होतं असं म्हटलं जातं. या आधी या चित्राचं श्रेय फक्त 'लियोनार्दो दा विंची स्टुडिओ'ला दिलं जायचं.
पण, मोनासिलाचं खरं चित्र आणि या सापडलेल्या चित्रावर एकाच व्यक्तीनं काम केलं आहे असं म्हणण्यासाठी तज्ज्ञांकडं सबळ पुरावा आहे.
पॅरिसच्या ल्यूर संग्रहालयात केलेल्या परीक्षणानंतर तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, ''हे रेखाचित्र लिओनार्दोच्याच कलाकुसरीचा भाग आहे. हे चित्र 1862 मध्ये इटलीच्या कोंडे संग्रहालयात ठेवलं होतं. जे आता उत्तर फ्रान्सच्या 'पॅलेस ऑफ शैंटिली'मध्ये आहे.''
लिओनार्दो दा विंची (1452-1519) हे इटलीतील एक महान चित्रकार होते. त्यांच्या मोनालिसाच्या पेंटिंगला जगातील सर्वश्रेष्ठ कलाकुसरींमध्ये गणलं जातं.
याबाबत मैथ्यू डेल्डिक यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "चित्रातील चेहऱ्याची आणि हाताची रचना अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं केली आहे.
शिवाय, आम्ही याचा शोध घेत आहोत की, लिओनार्दोच्या आयुष्यातील शेवटच्या दिवसांत त्याच्यासारखं काम दुसरं कुणी करत होतं का? कारण हे नक्की आहे की, त्याच काळात इथं तैलचित्र काढण्यास सुरूवात झाली होती."
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)