वाईन नष्ट करण्यासाठी 'हा' देश खर्च करणार तब्बल 1782 कोटी रुपये

फोटो स्रोत, getty images
- Author, अॅलेक्स बिनले
- Role, बीबीसी प्रतिनिधी
फ्रान्स सरकार वाईन नष्ट करण्यासाठी आणि नुकसान झालेल्या उत्पादकांना मदत देण्यासाठी जवळपास साडे सतरा अब्ज रुपयांपेक्षा अधिक रक्कम (€200m) खर्च करणार आहे.
फ्रान्समध्ये लोक क्राफ्ट बिअरचं अधिक सेवन करत आहेत. त्यामुळे वाईनची मागणी घटत आहे. ही मागणी घटल्यानं वाईन उद्योग संकटात आला आहे.
महागाई आणि अतिउत्पादन, त्यात वाईनवर अधिभार लावण्यात आल्यानं वाईन उद्योगाला फटका बसला आहे.
ही अतिरिक्त वाईन आता हॅन्ड सॅनिटायझर, साफ-सफाईची उत्पादनं आणि परफ्युम यासारख्या वस्तूंमध्ये वापरली जाणार आहेत.
वाईनचं जादा उत्पादन कमी करताना, वाईन उत्पादकांना ऑलिव्हसारख्या इतर उत्पादनांसाठी पैसे देखील उपलब्ध होतील.
कोसळणाऱ्या किंंमती थांबवणं, जेणेकरून वाईन निर्मात्यांना पुन्हा कमाईचे स्रोत मिळू शकेल, हे या उद्योगाला निधी देतान फ्रान्स सरकारचं उद्दिष्ट आहे. फ्रान्सचे कृषिमंत्री मार्क फेसनेऊ यांनी ही माहिती दिलीय.
सरकारनं आर्थिक मदत साडे सतरा अब्ज रुपयांपेक्षा अधिक (€200m ) वाढवलीय.
"वाईन उद्योगाच्या भविष्याकडे पाहताना ग्राहकांचाही विचार करणं आवश्यक आहे. त्यासाठी अनुकूल परिस्थती निर्माण करणं आवश्यक आहे," असं कृषिमंत्री म्हणाले.
युरोपियन कमिशनचा जूनपर्यंतचा वार्षिक डेटा सांगतो की, वाईनचा वापर इटलीमध्ये 7%, स्पेनमध्ये 10% , जर्मनीमध्ये 22% आणि पोर्तुगालमध्ये 34% कमी झाला आहे. त्या तुलनेत वाईनचं उत्पादन 4 % ने वाढलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








