You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हे 7 बदल स्वीकारलेत तर तुम्ही राहाल आनंदी आणि निरोगी
- Author, मसौदा
- Role, बीबीसी न्यूज वर्ल्ड
आपल्या सर्वांना माहीत आहे की सकस अन्न खाणं किती महत्त्वाचं आहे. आणि नवीन वर्षं सुरू झालं की बरेच जण असा आहार घेण्याचा संकल्प करतात.
पण वास्तविक जीवनात आपण ही गोष्ट अमलात आणायचा प्रयत्न करतो तेव्हा समजतं की हे करणं तर आपल्यासाठी अवघड आहे.
सात्विक आणि संतुलित आहार हे काही विशेष पदार्थ असतात असं नाही, पण या आहाराचं महत्त्व निर्विवाद आहे.
बीबीसीच्या द फूड प्रोग्राम मध्ये लिव्हरपूल जॉन मूर्स विद्यापीठातील मानवी शरीरविज्ञानाचे प्राध्यापक ग्रीम एल. क्लोज यांनी हे ध्येय साध्य करण्यासाठी सात सूचना दिल्या आहेत.
1. रोज थोडा तरी व्यायाम करण्याचा प्रयत्न करा
सकाळी थोडा व्यायाम केल्याने तुमची चयापचय क्रिया सक्रिय होते. शिवाय पुढचा दिवस चांगला जावा आणि ताजंतवाणं वाटावं यासाठी मदत मिळते.
यासाठी जिम किंवा खूप जोरात पळण्याची गरज नाही. काही तरी असा व्यायाम करा जेणेकरून तुम्हाला धाप लागेल, श्वास घेण्यास थोडा कठीण वाटेल असा व्यायाम करा.
तुम्हाला सक्रिय करण्यासाठी एक "छोटेसा प्रयत्न" देखील पुरेसा असेल.
2. जास्तीत जास्त भाज्यांचं सेवन करा
भाजीपाल्यामुळे केवळ शरीराला फायदा होतो असं नाही तर त्यातून तृप्ततेची भावना देखील मिळते. आणि पुढच्या जेवणापर्यंत ही भावना टिकून राहते.
ऑम्लेटमध्ये पालक, मशरूम, ताजे टोमॅटो आणि लाल मिरची टाकणे हा एक सोपा मार्ग आहे.
दुसरा मार्ग म्हणजे हंगामी फळं भाज्या आणि उकडलेली अंडी खा. किंवा या भाज्यांच्या रसाचं देखील सेवन करता येतं.
3. योजना करा आणि अंदाज लावा
जर तुम्ही वेळेआधी तयारी केली, तर तुम्हाला भूक लागण्याची शक्यता कमी आहे.
भूक लागल्यावर जर आपण जेवणाची तयारी करायला घेतली तर मात्र आपल्याकडून चुका होतात. आणि आपण आरोग्यदायी पर्याय सोडून इतर पदार्थ खातो.
त्यामुळे तुम्ही बाहेर असताना किंवा जवळपास जात असताना तुमच्या पिशवीत काहीतरी खाद्यपदार्थ घेऊन जा. आणि याचा दुहेरी फायदा होतो. जाता जाता खरेदी करण्यापेक्षा आपण स्वस्त आणि चांगल्या गोष्टी सोबत नेऊ शकतो.
4. वाढत्या वयाबरोबर प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
"जंक फूड" टाळा!
वृद्ध लोकांना गोड पदार्थ आणि कर्बोदकयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा होते. परंतु त्यांना स्नायूंची झीज टाळण्यासाठी अधिक प्रथिनांची आवश्यकता असते.
5. सुपरमार्केट मध्ये दाखवल्या जाणाऱ्या प्रलोभनांना बळी पडू नका
बहुतेक मोठी दुकाने आणि सुपरमार्केट आपल्याला अनेक पदार्थांवर सवलती देतात. हे पदार्थ बऱ्याचदा शरीरासाठी हानिकारक असतात.
त्यामुळे तुमचे हात तुमच्या खिशात ठेवा आणि काऊंटरवर गेल्यावरच ते बाहेर काढा.
यामुळे तुम्ही हे पदार्थ खरेदी करण्याचा मोह आवराल.
6. निराश होऊ नका
जर तुम्ही संतुलित आहार निवडला असेल तर त्याचा आनंद घ्या, त्याबद्दल दोषी वाटून घेऊ नका.
फक्त एक दोनदा सवय होईपर्यंत प्रयत्न करा, त्यानंतर हा तुमच्या दिनचर्येचा भाग होऊन जाईल.
7. हायड्रेटेड रहा पण जास्त कॅलरीज शरीरात घेऊ नका
थंड पाणी हा आहारातील सर्वोत्तम आणि स्वस्त पर्याय आहे.
ज्यूस, अल्कोहोल किंवा कार्बोनेटेड पेयांमध्ये आपल्याला अंदाज नाही इतकी साखर असते.
निरोगी मानवी शरीर दोन तृतीयांश पाण्याने बनलेले आहे.
रक्तातील पोषक तत्व संपूर्ण शरीरात नेण्यास मदत करण्यासाठी द्रव पदार्थ आवश्यक असतात. आणि आपल्या पेशींमध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांमध्ये देखील त्यांचा सहभाग असतो.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)