संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रात मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचे नाव

संतोष देशमुख

फोटो स्रोत, Facebook/Sandeep Kshirsagar

फोटो कॅप्शन, मृत संतोष देशमुख

संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे.

तर आरोपपत्रामध्ये आरोपी क्रमांक दोनमध्ये विष्णू चाटेचा उल्लेख आहे. आवादा कंपनीला खंडणी मागितली आणि त्यातून झालेल्या वादानंतर हत्या झाल्याचंही यात म्हटलं आहे.

वाल्मिक कराडने विष्णू चाटेचा मोबाईल वापरून आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या प्रोजेक्ट मॅनेजर सुनील केंदू शिंदे यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. तसंच 29 नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरूनही कराडने खंडणी मागितली होती .

संतोष देशमुखांच्या गावामध्ये सहा डिसेंबर रोजी सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि सांगळेंशी आवादा पवनचक्की प्रकल्पावरती वाद घडला होता.

या संपूर्ण प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराडविरुद्ध सबळ पुरावे मिळाल्याचं समोर येत आहे. खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे.

संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हीडिओही सीआयडीकडे असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळं आता या प्रकरणी सुनावणी होणाऱ्या सुनावणीत वाल्मिक कराड मुख्य आरोपी असेल.

दोन आरोपींना पुण्यातून अटक

यापूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेले दोन आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे यांना बीड पोलिसांच्या विशेष शोध पथकानं पुण्यातून अटक केली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. हत्येची घटना घडली त्यादिवशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीने मयत संतोष देशमुख यांचे लोकेशन दिल्याचा संशय आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. तसंच या प्रकरणी नुकताच सर्वपक्षीय मूक मोर्चाही काढण्यात आला होता.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 1

दरम्यान, यापूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात 31 डिसेंबर रोजी शरण आले. सीआयडी कार्यालयातच त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांना केजला पाठवण्यात आलं.

वाल्मिक कराड यांना केजच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी झालेल्या सुनावणीनंतर वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

वाल्मिक कराड शरण आल्यानंतर सीआयडीचे पोलीस उपमहानिरीक्षक सारंग आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरला दुपारी 12.30 वाजण्याच्या दरम्यान वाल्मिक कराड स्वतःहून सीआयडीच्या मुख्यालयात हजर झाले. त्यांची तिथं थोडीफार चौकशी करून, त्यांना तपासी अंमलदारांच्या ताब्यात दिलं आहे. वाल्मिक कराड यांना बीडला रवाना केलं गेलं.

अनिल गुजर हे बीडचे सीआयडीचे डीवायएसपी असून, त्यांच्या ताब्यात वाल्मिक कराड यांना देण्यात आल्याची माहिती सारंग आव्हाड यांनी दिली होती.

वाल्मिक कराड

फोटो स्रोत, FACEBOOK/WALMIK KARAD

फोटो कॅप्शन, वाल्मिक कराड

पुणे सीआयडीसमोर शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी व्हीडिओ जारी केला होता.

त्यात त्यांनी म्हटलं, "केज पोलिस स्टेशनला खोटी फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामिनीचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरेंडर होत आहे."

कराड पुढे म्हणाले, "संतोष देशमुख यांच्या मारेकरांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पुढील तपासात मी दोषी दिसलो तर न्यायालय जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे."

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 2

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

या हत्येचे पडसाद राज्यभर उमटले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली.

या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता.

वाल्मिक कराडांवरून राजकीय गदारोळ

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या गंभीर हत्या प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याची तेथील गावकऱ्यांना शंका असल्याची माहिती विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी सभागृहात दिली होती.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, "राज्यात कायदा सुव्यस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. एका सरपंचाला उचलून नेलं जातं आणि त्याचा खून केला जातो. वाल्मिक कराड या सर्व प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे. वाल्मिक कराडच्या मागे कोण आहे, हे सर्वांना माहिती आहे. ज्या नेत्याचं पाठबळ या प्रकरणातील आरोपींना असल्याचं बोललं जातंय, त्या नेत्याला मंत्रीपद दिलं जातं."

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, "या प्रकरणातील एक आरोपी वाल्मिक कराड याची गुन्हेगारी पार्श्वभूमी बीडमधल्या छोट्यातल्या छोट्या पोरांनाही माहिती आहे. वाल्मिक कराडने कोणालीही उचलावं, कोणालाही मारावं आणि त्याचा मृतदेह गायब करावा असा आजपर्यंतचा बीडचा इतिहास आहे. मंत्रिमंडळाची स्थापना होण्याआधी हे सगळं घडतं आणि त्याची दखलीही घेतली जात नाही. चौकशी करणारे पोलीस आरोपींबरोबर चहापान करताना दिसतात, हे संस्कारक्षम राज्याची मानहाणी करणारं आहे."

वाल्मिक कराड

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, वाल्मिक कराड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आल्याचं आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं म्हटलं होतं.

तर, धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्या, असं म्हटलं होतं.

दरम्यानच्या काळात वाल्मिक कराड यांची पत्नी आणि त्यांच्या संपर्कातील काही जणांची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली. तर काहींच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आलीय.

वाल्मिक कराड कोण आहेत?

वाल्मिक कराड हे मूळचे परळी तालुक्यातील पांगरी गावचे रहिवाशी आहेत. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी ते परळीत आले. उपजिविकेसाठी कधीकधी ते जत्रेत सिनेमे दाखवायचे.

पुढे गोपीनाथ मुंडेंच्या घरात वाल्मिक कराड घरगडी म्हणून दूध, भाजीपाला, किराणा आणण्याची कामं करू लागले.

गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे मार्ग वेगळे झाल्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत गेले.

वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचे माजी नगरसेवक, परळी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आणि माजी गटनेता, नाथ प्रतिष्ठानचे सदस्य, बीड जिल्हा स्थायी समिती सदस्य आणि गेल्या 10 वर्षापासून परळी मतदारसंघातील धनंजय मुंडेंच्या राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडच्या पोलिस स्टेशनमध्ये खंडणीशी संबंधित गुन्हा वाल्मिक कराड यांच्याविरोधात दाखल आहे.

'आका' खुनाच्या प्रकरणातून बाहेर राहतील असं वाटत नाही

वाल्मिक कराड शरण आल्यानंतर आष्टीचे आमदार सुरेश धस म्हणाले की, "राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परतेनं केलेल्या कारवाईमुळं, सीआयडीच्या समोर वाल्मिक कराड यांना शरण यावं लागलं आहे. या कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन. सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून वाल्मिक कराड यांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आणि यामुळेच वाल्मिक कराड हे शरण आले. वाल्मिक कराड यांच्या मालमत्ता लवकरात लवकर जप्त झाल्या पाहिजेत आणि ते झाल्याशिवाय 'आका'ने केलेलं इतर गुन्हे उघडे पडणार नाहीत. असं झालं नाही तर आम्हाला दुसरा मार्ग अवलंबावा लागेल."

सुरेश धस

फोटो स्रोत, Maharashtra Assembly

सुरेश धस म्हणाले की, "या प्रकरणातील तीन आरोपींपैकी सुदर्शन आणि प्रतीक घुले यांनी संतोष देशमुख यांना गंभीर मारहाण केली आहे. विष्णू चाटेवर सुद्धा 302 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे. सध्या विष्णू चाटे याला 120(ब) कलमाखाली अटक करण्यात आलेली आहे. याचबरोबर आता शरण आलेले 'आका' यांनी व्हीडिओ कॉल बघितला असेल तर त्यांच्यावर देखील खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे."

वाल्मिक कराड यांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन माझ्यावर आरोप केले जात आहेत असं म्हटलं आहे. यावर बोलताना सुरेश धस म्हणाले की, "असे आरोप करून ते स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशीच घटना माझ्या मतदारसंघात ऑक्टोबर 2023 ला घडली होती. ओ2 कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी असेच उचलून नेले जात होते. त्यावेळी मी असं बोललो होतो की 'परळी पॅटर्न' आमच्या इथे आणू नका. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं."

सुरेश धस म्हणाले की, "असे अनेक प्रकार पचवून घेतल्यामुळे दोन कोटींची खंडणी मागण्याची हिंमत करण्यात आली. त्यापैकी पन्नास लाख रुपये पोहोचले होते, आणि राहिलेले पैसे घेण्यासाठीच हे लोक पाठवले गेले असावेत. त्यामुळे 'आका' या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवू शकतील असं वाटत नाही."

वाल्मिक कराडला अटक करता न येणे भाजपा सरकारचे अपयश

संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत बोलताना प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, "राज्यातील पोलीस दल व सीआयडी आजही सक्षम आहेत पण ते राजकीय दबावाखाली असल्याने त्यांचे मनोबल कमजोर होते. आरोपी शरण येतो पण त्याला पकडू शकत नाही ही लाजीरवाणी व दुर्दैवी बाब आहे. बीड प्रकरणाने सक्षम नेतृत्व म्हणून गवगवा केला जात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्यादाही राजकारणापुढे स्पष्ट झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा काय अधिकार आहे? नागपूरमध्ये ७ दिवसात ७ खून झाले आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा व मीडियातून होणारे स्वतःचे कौतुक थांबवावे."

अतुल लोंढे

अतुल लोंढे म्हणाले की, "बीड प्रकरणात सत्ताधारी पक्षाचे आमदारच सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करत आहेत. बीड मधील गुन्हेगारीला सत्ताधारी पक्षाचे आमदार 'गँग्ज ऑफ वासेपूर' म्हणतात. बीडमधील गुन्हेगारीला आळा घालून राजकीय आशिर्वादाने फोफावलेली ही विषवल्ली कायमची नष्ट करा व यामागे ज्यांचा हात आहे त्यांनाही अद्दल घडवावी."

"बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी २० दिवस पोलीस व सीआयडीला सापडला नाही तो शरण आला हे पोलीस दलाचे अपयशच आहे. बीडमधील संघटीत गुन्हेगारीचा गंभीर प्रकार पाहता या प्रकरणाचा तपास विद्यमान न्यायमूर्ती यांच्या देखरेखीखाली झाला पाहिजे," अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.